नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकदाच 4000 रुपये मिळणार का? शेतकऱ्यांना पाहावी लागत आहे चौथ्या हप्त्याची वाट..

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकदाच 4000 रुपये मिळणार का? शेतकऱ्यांना पाहावी लागत आहे चौथ्या हप्त्याची वाट..

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता namo shetkari yojana 4th hapta
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकदाच 4000 रुपये मिळणार का?

व्हायरल फार्मिंग : नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकदा 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला होता. लोकसभेच्या तोंडावरच नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता आल्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एकदाच दोन दोन हप्ते वितरित करण्यात आले होते.

तसेच फेब्रुवारी महिन्यात मागील हप्ता वितरित केल्यामुळे पुढील हप्ता जुन महिन्यात पेरणी खर्च भागवण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना देईल असे शेतकऱ्यांना वाटत होते, परंतु नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता वितरील होऊन जवळपास 6 वा महिना लागला आहे, तरी अजून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आलेला नाही.

लोकसभेच्या तोंडावर एकदाच दोन हप्ता शेतकऱ्यांना दिले गेले होते आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राज्य सरकार शेतकऱ्यांना पुन्हा खुश करण्यासाठी एकदाच चौथा आणि पाचवा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करते किकाय असा शेतकऱ्यांना प्रश्न पडू लागला आहे.

तिसरा हप्ता वितरित होऊन सहावा महिना लागला आहे, तरी पुढील दोन महिन्यात विधानसभेचा निवडणुका देखील लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी निवडणुकी अगोदर दोन हप्ते शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्याची शक्यता राहू शकते.

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा नादात चार महिने कालावधी उलटूनही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेला नसून, शेतकरी हात उसने पैसे घेऊन कीटकनाशक व खतावर खर्च करत आहे. जुन महिन्यात पेरणी वेळी चौथा हप्ता मिळाला नाही आता ऑगस्ट महिन्यात कीटकनाशक फवारणी करण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देईल या प्रतिक्षावर आर्थिक अडचणीत कर्ज बाजारी झालेले शेतकरी कर्ज काढून औषधी खरेदी करून पीक वाचवत आहे.

तसेच गेल्या वर्षी सोयाबीन व कापसाला मिळालेला कमी भाव त्यामुळे या खरीप हंगामात पिकावर खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना खर्च करण्यासाठी पैशाची आर्थिक अडचण होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा करावा म्हणजे आर्थिक पाठबळ मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कालावधी संपला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकदाच दोन हप्ते मिळू शकतात असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.

नमो शेतकरी योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. आज पर्यंत या योजनेतून 6000 रुपये जमा झालेले आहे. पहिला हप्ता 2000 रुपये आणि दुसरा व तिसरी हप्ता लोकसभेच्या तोंडावर एकदाच 4000 रुपये जमा करण्यात आले होते म्हणजे या योजनेतून आजपर्यंत 6000 रुपये शेतकऱ्यांचा खात्यात DBT द्वारे जमा झालेले आहे. मागील हप्ता 28 फेब्रुवारीला मिळाले असून जवळपास सहा महिने झालेले आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तरी चौथा हप्ता जमा होईल अशी राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतीक्षा आहे.

चौथा हप्ता कधी मिळेल?

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 2000 रुपये कधी मिळणार याबद्दल आजूनही राज्य सरकारने भाष्य केलेले नाही परंतु दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून जवळपास सहावा महिना लागलेला आहे. तरी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. परंतु चौथा हप्ता कधी देण्यात येणार यावर राज्य सरकारने भाष्य केलेले नाही.

• वार्षिक 12000 रुपये आर्थिक मदत? ती कशी पाहा..

राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पिएम किसान योजना या दोन योजनेतून वार्षिक 12000 रुपये शेती खर्चासाठी मदत मिळावी त्यासाठी देण्यात येत आहे. पिएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना होत असलेला फायदा पाहून राज्य सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळावा त्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. तसेच या योजनेतून राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. वार्षिक 12000 रुपये कसे तर मित्रांनो पिएम किसान योजनेतून वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात तसेच पिएम किसान योजनेचा धर्तीवरच नमो शेतकरी योजने अंतर्गत 6000 रुपये वार्षिक दिले जातात. असे एकूण राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही योजने अंतर्गत 12000 रुपये वार्षिक दिले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *