नमो शेतकरी योजना:- नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात लवकरच जमा होणार.
Central government schemes:- PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता दिनांक / 28 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षी 6 हजार रुपये तीन टप्यात देण्यात येतात. देशातील शेतकऱ्यांना एक शेतिकामासाठी आर्थिक मदत मिळावी त्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे.
Central Government Scheme केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने प्रमाणे State Government राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे.
नमो शेतकरी दुसरा हप्ता व पी एम किसान चा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात जमा होणार:-
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता (Second Installment) लवकरच राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 1792 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्या अगोदरच म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्यात तब्बल 72 कोटी रुपये अधिक वाढ करण्यात आली आहे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी अंतर्गत 1792 कोटी रुपये हप्ता देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी 1720 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसरा हप्ता 72 कोटी रुपये वाढून 1792 कोटी रुपये वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
फेब्रुवारी च्या अखेर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा होणार आहे धन्यवाद…