पंजाब डख; आज 26 जुलै पुढील तीन दिवस या भागात मुसळधार पाऊस! (Panjab Dakh Havaman Andaj New)…
व्हायरल फार्मिंग : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा आज दिनांक/ 26 जुलै रोजी नवीन अंदाज जाहीर झाला असून. पुढील तीन दिवस राज्यातील या भागात होणार मुसळधार..
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती विषयक व हवामान विषयक माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा, तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• दिनांक/ 26 व 27 जुलै कोणत्या भागात सर्वाधिक पावसाचा मुक्काम.
नाशिक जिल्ह्यात काही भाग पावसाने सोडला असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की या भागात सुद्धा आज आणि उदया पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. दिनांक/ 26 व 27 जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.
• आज आणि उदया मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार असून सरीवर सरी पाऊस होणार आहे, परंतु हा पाऊस मध्यम व हलका असेल. मराठवाड्यात सध्या तरी मोठा पाऊस पडणार नाही. परंतु दिनांक/ 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
• फवारणी व्यवस्थापन :-
दिनांक/ 26 व 27 जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून पुढील तीन दिवस फवारणीसाठी योग्य वेळ नाही. मराठवाड्यात मध्यम व हलका पाऊस होणार असून काही भागात पाऊस उघड घेणार आहे. तरी वेळ मिळेल त्या नुसार फवारणी करून घ्यावी.
• सोयाबीन पाने खाणारी अळी :-
ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला असून त्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी. सोयाबीन पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हे पोषक वातावरण आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात अळी पडली आहे. तरी पावसाची विश्रांती राहिल्यास वेळ मिळेल त्यानुसार कीटकनाशक फवारणी करून घ्यावी असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना दिला आहे.
• पावसाचा जोर कधी वसरणार :-
पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, कोकण आणि विदर्भात अनेक दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून पावसाचा जोर कधी वसरणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. पंजाब डख यांना दिलेल्या नवीन अंदाजानुसार दिनांक/ 26 ते 27 जुलै दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच दिनांक/ 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान पावसाचा दुसरा टप्पा असणार असून या कालावधीत मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..