पिकांच्या अवस्थेनुसार विद्राव्य खते फवारणी व्यवस्थापन :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थे नुसार वेगवेगळ्या विद्राव्य खतांचा वापर कसा करावा व योग्य त्या अवस्थेत वापर करून विद्राव्य खताचा 100 टक्के फायदा कसा करून घ्यावा त्या बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ.
मित्रांनो पिकांच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर केल्यास त्या खतंचा मोठा फायदा उत्पादन वाढीसाठी झालेला दिसून येतो.
प्रामुख्याने विद्राव्य खतामध्ये 19-19-19, 12-61-00, 00-52-34, 00-00-50 व 13-00-45 विद्राव्य खते आहेत.
शेतकरी मित्रांनो पिकामध्ये प्रामुख्याने एकूण 4 वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात.
पहिली अवस्था आहे पीक वाढीची अवस्था.
दुसरी अवस्था आहे फुटवे वाढीची अवस्था.
तिसरी अवस्था आहे फुल लागण्याची अवस्था.
चौथी अवस्था आहे फळ पोसण्याची अवस्था तर शेतकरी मित्रांनो ह्या प्रमुख चार अवस्था आहेत पिकामध्ये दिसून येतात, याच 4 अवस्थेत आपल्याला या वेगवेगळ्या विद्राव्य खतांचा वापर खालील दिलेल्या माहिती प्रमाणे करायचा आहे.
19-19-19 विद्राव्य खत –
शेतकरी मित्रांनो 19-19-19 विद्राव्य खतामध्ये नत्र, स्पुरद व पालाश सम प्रमाणात आहे म्हणजे 19% नत्र, 19% स्पुरद तर 19% पालाश आहे. 19-19-19 या विद्राव्य खताला स्टार्टर खत म्हणतात म्हणजे पिकाच्या पिकाच्या सुरुवाती अवस्थेत वापरण्यासाठी या खताचा वापर केला जातो. साधारण पीक पेरणी पासून 20 ते 25 दिवसांनी या खताचा वापर केला जातो या खताचा वापर केल्यामुळे पिकाला सम प्रमाणात नत्र, स्पुरद व पालाश उपलब्ध होऊन पिकाची जोमदार वाढ झालेली दिसून येते.
डोस – 4 ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी द्वारे किंव्हा ठिबक द्वारे करता येतो.
12-61-00 विद्राव्य खत –
शेतकरी मित्रांनो 12-61-00 या विद्राव्य खतामध्ये 12% नत्र, 61% स्पुरद तर 00% पालाश चे प्रमाण आहे. या विद्राव्य खतामध्ये नत्राचे प्रमाण कमी असल्यामुळे झाडाची वाढ थांबून फुटवा वाढवण्यासाठी मदत होते तर 61% स्पुरद असल्यामुळे पिकातील मुळांची वाढ निरोगी व जोमदार झालेली दिसून येते. 12-61-00 या विद्राव्य खताचा वापर फुल अवस्था सुरू होण्याअगोदर फुटवे संख्या वाढवण्यासाठी करता येतो. या खतात 12% नत्र असल्यामुळे शक्य तो फुल अवस्थेत या विद्राव्य खताचा वापर टाळावा.
डोस – 4 ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारावे करता येते किंव्हा ठिबक द्वारे या विद्राव्य खताचा वापर करता येतो.
00-52-34 विद्राव्य खत –
शेतकरी मित्रांनो 00-52-34 या विद्राव्य खतामध्ये 00% नत्र, 52% स्पुरद तर 34% पालाश आहे. या विद्राव्य खतामध्ये 00% नत्र असल्यामुळे तुम्ही या विद्राव्य खताचा वापर पिकांच्या फुल अवस्थेत करू शकता. या विद्राव्य खताचा वापर फुल अवस्थेत केल्यास फुल गळ कमी होते व फुलांची संख्या जास्त लागते तसेच 52% स्पुरद असल्यामुळे पिकातील मुळांची वाढ जोमदार होते व मुळानद्वारे झाडांना अन्नपुरवठा सुरळीत होतो. त्याचबरोबर या विद्राव्य खतात 34% पालाश असल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
डोस – 4 ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारावे किंव्हा ठिबक द्वारे 200 लिटर पाण्यातून 1 किलो सोडावे.
13-00-45 विद्राव्य खत –
शेतकरी मित्रांनो 13-00-45 या विद्राव्य खतामध्ये 13% नत्र, 00% स्पुरद व 45% पालाश असल्यामुळे या विद्राव्य खताचा वापर कडधान्य पिकासाठी जास्त फायदा होऊ शकतो. 13% नत्र असल्यामुळे पिकाच्या शेंगा किंव्हा फळ अवस्थेत वापर केल्यास शेंगात दाने व फळ पोसण्यासाठी मदत होते. या विद्राव्य खतात असलेले नत्र झाडाच्या मुळावर असलेल्या जिवाणूंच्या गाठी ना खाद्य पुरवठा चांगला होतो. तसेच 45% पालाश असल्यामुळे झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते फळांची गुणवत्ता वाढते व उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येत.
डोस – या विद्राव्य खताचा वापर 4 ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारावे द्वारे करावा किंव्हा 200 लिटर पाण्यातून 1 किलो ठिबक द्वारे सोडावे.
00-00-50 विद्राव्य खत –
शेतकरी मित्रांनो 00-00-50 विद्राव्य खतामध्ये 50% असे अधिक प्रमाणात पालाश आहे त्याच बरोबर 17.5% गंधक आहे त्यामुळे या विद्राव्य खताचा वापर तेलवर्गित किंव्हा कडधान्य पिकाच्या शेंग अवस्थेत केल्यास शेंग पोसण्यासाठी मोठा फायदा होतो. अधिक प्रमाणात पालाश असल्यामुळे फळांची गुणवत्ता वाढते व फळांना बाजारभाव चांगला मिळतो.
डोस – या विद्राव्य खताचा वापर 4 ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारावे द्वारे करावा किंव्हा ठिबक द्वारे 1 किलो 200 ली पाण्यातून सोडावे.
शेतकरी बांधवांनो आज आपण या पोस्ट च्या मध्येमातुन आपल्या सध्या आणि सरळ भाषेत वेगवेगळ्या विद्राव्य खता बद्दल वैज्ञानिक माहिती घेतली आहे तुम्ही ही पोस्ट सविस्तर वाचल्या बद्दल तुमचे धन्यवाद…