Top Tonic; पिकाच्या जोमदार फुटवा व वाढीसाठी टॉनिक 6 टॉनिक संपूर्ण माहिती..
शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. सोयाबीन किंव्हा कापूस या पिकाच्या सुरुवाती काळात वाढीसाठी तसेच फुटवा जास्त लागण्यासाठी टॉनिक वापराने गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो कापूस, सोयाबीन या पिकात जेवढा जास्त फुटवा लागेल तेवढे अधिक उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाच्या वाढीच्या काळात टॉनिक वापरणे गरजेचे आहे. परंतु कोणते टॉनिक वापरावे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती. मित्रांनो आज आपण पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुटवा अधिक प्रमाणात लागण्यासाठी टॉप काही टॉनिक बद्दल माहिती घेणार आहे.
1- Biovita X Tonic:- ( बायोविटा एक्स टॉनिक).
शेतकरी मित्रांनो PI कंपनीचे हे टॉनिक असून. कुठ्ल्याही पिकात फुटवा वाढवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अत्यंत चांगला रिझल्ट देणारे टॉनिक असून याचा वापर कापूस किंव्हा सोयाबीन पिकात करायचा असेल तर सुरुवातीच्या अवस्थेत करावा. या टॉनिक चा डोस 40 मिली प्रती पंप आहे. कुठ्ल्याही पिकासाठी या टॉनिक चा वापर करता येतो.
2- Tata Bahaar Tonic:- ( टाटा बहार टॉनिक).
शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे हे टॉनिक आहे. या टॉनिक मध्ये भरघोस प्रमाणत अमिनो ऍसिड आहे, त्यामुळे पिकाच्या प्रत्येक अवस्थेत तुम्ही या टॉनिक चा वापर करू शकता. पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुलांची संख्या वाढवण्यासाठी या टॉनिक चा वापर केला जातो. टाटा बहार हे टॉनिक प्रत्येक पिकासाठी वापरता येते. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकासाठी वापरायचे झाल्यास 40 मिली प्रती पंप घ्यावे.
3- Taboli PGR Tonic:-
टाबोली हे सुमिटोमो कंपनीचे pgr असून याचा वापर पिकाची अतिरेक होणारी वाढ कमी करण्यासाठी तसेच फुटवा संख्या वाढवण्यासाठी केला जातो. या टॉनिक चा वापर 3 मिली प्रती पंप साठी करावा.
4- Fantac Plus Tonic:- (फँटॅक प्लस टॉनिक).
हे टॉनिक कोरोमंडल कंपनीचे आहे. या टॉनिक मध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन, अमिनो ऍसिड घटक आहेत. पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच शाखीय वाढीसाठी याचा वापर 10 मिली प्रती पंप या प्रमाणे केला जातो.
5- Isabion tonic:- (इसाबियन टॉनिक माहिती).
हे सिंजेंटा कंपनीचे टॉनिक असून यात अमिनो ऍसिड घट आहे. या टॉनिक चा वापर पिकाच्या जोमदार वाढीसाठी केला जातो. इसाबियन टॉनिक 40 मिली प्रती पंप या प्रमाणे वापरावे.
6- Sagarika Tonic:- (टॉनिक सागरीका).
सागरीका हे इफको (IFFCO) कंपनीचे टॉनिक असून हे एक समुद्रिय शेवाळापासून तयार केलेले टॉनिक आहे. पिकात फुटवा वाढवण्यासाठी या टॉनिक चा वापर 40 मिली प्रती पंप केला जातो.
शेतकरी मित्रांनो कुठ्ल्याही कंपनीचे टॉनिक तुम्ही वापरत असाल, तर कंपनीने जो डोस दिला आहे तो योग्य प्रमाणात घ्यावा तसेच फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे धन्यवाद.