पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता व दिसून येणारे लक्षणे:-
शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे, मित्रांनो आज आपण आपल्या आणि अगदी सोप्या भाषेत पिकातील अन्नद्रव्य कमतरतेमुळे दिसून येणाऱ्या लक्षणाची माहिती घेणार आहोत.
पिकाच्या वाढीसाठी प्रथम, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये नत्र म्हणजे nitrogen, स्पुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालाश म्हणजे पोटॅश असे एकूण तीन प्रथम अन्नद्रव्य आहेत. प्रथम अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्पुरद व पालाश हे तीन अन्नद्रव्य खूप महत्वाचे आहे म्हणून यास प्रथम अन्नद्रव्य म्हणतात. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर या अन्नद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणून वळख आहे.
प्रथम अन्नद्रव्य – Nitrogen (नत्र), Phospharus (स्पुरद) व Pottash (पालाश) आहे.
दुय्यम अन्नद्रव्य – Calcium (चुना), Magnecium (मॅग्नेशियम) व Sulfer (गंधक) आहे.
आता आपण अन्नद्रव्य कमतरता मुळे दिसून येणारे लक्षणे बघू –
Nitrogen (नत्र):- नायट्रोजन हे एक प्रथम अन्नद्रव्य आसून याची खूप मोठ्या प्रमाणात पिकासाठी गरज असते. नायट्रोजन म्हणजे नत्र अन्नद्रव्य कमतरते मुळे झाडाचे पाने पिवळी पाडून पानातील हरितद्रव्य कमी होते व झाडांची वाढ थांबते. नत्र या अन्नद्रव्याचा अभाव पिकातील जुन्या म्हणजे खालच्या पानावर दिसून येतो. पिकातील पाने पिवळी पडतात वाढ थांबते.
उपाय – नत्र या अन्नद्रव्याचा अभाव दिसून आल्यास 2 टक्के युरिया खताची फवारणी करावी किंव्हा जमिनीत पेरणी बरोबर बेसल डोस म्हणून युरिया खताचा वापर करावा किंव्हा नत्रयुक्त विद्राव्य खतांचा वापर गरजेचा.
Phospharus (स्पुरद):- फॉस्फरस या अन्नद्रव्यांची गरज मुळांची निरोगी वाढ होण्यासाठी आहे, हे अन्नद्रव्य कमी पडल्यास मुळांची वाढ थांबते. फॉस्फरस या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास झाडाच्या पानावर जांभळे ठिपके दिसतात व झाडांची देठे वाकडी होतात.
उपाय – डि ए पी (DAP) या खताचा वापर केल्यास कमतरता भासत नाही, कारण या खतात 46 टक्के स्पुरद आहे. तसेच स्पुरद युक्त विद्राव्य खाते फवारणीच्या मध्येमातून वापरावे.
Potash (पालाश):- पालाश हे एक अत्यंत महत्वाचे प्रथम अन्नद्रव्य आहे. पालाश या अन्नद्रव्याची गरज फळबाग पिकासाठी अधिक आहे. फळ तडकने (fruit cracking) हा अभाव पालाश या अन्नद्रव्याची आहे. पानाच्या कडा पिवळसर पडून करपतात. फळांची गुणवत्ता बिघडते.
उपाय – पोटॅश युक्त खतांचा वापर करावा म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश खताचा वापर तसेच पोटॅश युक्त विद्राव्य खते फवारणीच्या मध्येमतून द्यावे. 00-00-50 हे एक पोटॅश युक्त विद्राव्य खत आहे.
दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय :-
Calcium (चुना):- कॅल्शियम हे एक अत्यंत महत्वाचे पिकासाठी लागणारे दुय्यम अन्नद्रव्य आहे. या अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास भुईमुग पिकातील शेंग फोस राहून शेंगत दाने भरत नाही. पिकातील शेंड्या कडील वाढ थांबते. पिकातील फुल अवस्थेत कळ्या व फुले गळतात. कोवळ्या पानांच्या कडा वाकड्या होतात.
उपाय :- कॅल्शियम युक्त खत म्हणजे ssp दाणेदार किंव्हा calcium nitrate चा वापर करावा.
Magnecium (मॅग्नेशियम):- कापूस पिकातील लाल्या हा मॅग्नेशियम कामतरते मुळे दिसून येतो तसेच पानातील हरितद्रव्य कमी होऊन पानातील शिरातील भाग फिकट हिरवा दिसतो कवळी पाने पातळ होऊन सुकतात.
उपाय :- एकरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट चा वापर करावा.
Sulfer (गंधक):- तेल वर्गीय पिकासाठी गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य खूपच महत्वाचे आहे. गंधक या अन्नद्रव्याचा तेल वर्गीय पिकासाठी वापर केल्यास तेलाचे प्रमाण वाढते व उत्पादनात मोठी वाढ दिसून येते. पिकातील मुळांची वाढ थांबते. शेंड्या कडील पाने पिवळी दिसतात व फिकट हिरवी दिसतात. शेंड्या कडील पांनाचा आकार बारीक दिसतो.
उपाय :- पीक पेरणी बरोबर गंधक युक्त खाते वापरावी ssp (Sing DCle super phosphate) या खतात 12 टक्के गंधक आहे तसेच एकरी 150 किलो जिप्सम (Gypsum) पेरणी अगोदर जमिनीत मिक्स करून द्यावे.
तर शेतकरी मित्रांनो आज आपण पिकासाठी लागणाऱ्या प्रथम व दुय्यम अन्नद्रव्याची सविस्तर माहिती घेतली आहे ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या पिकाच्या पानावर किंव्हा फळावर दिसून येणाऱ्या लक्षणावर अन्नद्रव्याचा अभाव वळखु शकता.
मित्रांनो पर्तेक पिकावर अन्नद्रव्ये कमतरतेचा अभाव दिसून येत असतो तो आपल्याला वळखता आला तर त्यावर आपण योग्य त्या खतांचा किंव्हा विद्राव्य खतांचा वापर करून तो अभाव भरून काढू शकतो. त्यामुळे सर्व प्रथम अन्नद्रव्य व पिकातील अन्नद्रव्यांचा अभाव माहिती असणे गरजेचे आहे.
तर आज आपण नत्र, स्पुरद व पालाश अन्नद्रव्य कमतरते मुळे काय अभाव दिसून येतो व त्यावर काय उपाय करावा या बद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे त्याच बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक अन्नद्रव्य कमतरते मुळे काय अभाव दिसून येतो व त्यावर काय उपाय करावा बद्दल ही संपूर्ण सविस्तर माहिती घेतली आहे धन्यवाद..