प्रधानमंत्री सूर्योदय योजना:- (Pradhanmantri Suryoday Yojana 2024).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक. 22 जानेवारी 2024 रोजी या योजनेची घोसना केली आहे. या योजनेचा हेतू/उद्दिष्ट देशातील एकूण 1 कोटी घरांवर रूफ टॉप सोलार (Roof top solar) बसवणे आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा:-
1- घरावरील रिकामे असलेले छेत त्यावर रुफ टॉप सोलार बसवून वीज निर्मिती करणे.
2- या योजनेमुळे भारत हा देश ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात करणार आहे.
3- या योजनेचे उद्देश अतिरेक येणारे वीज बिल कमी करणे आहे ज्यामुळे मध्येमवर्गिय लोकांना मोठा फायदा होणार आहे.
4- या योजने द्वारे घरांच्या छतावर सोलार बसवण्यात येणार असून यातून जी वीज निर्मिती होणार आहे याचा मोठा फायदा गरजवंत लोकांना वापरण्यासाठी होणार आहे.
5- हे सोलार पॅनल घरांच्या छतावर बसवल्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
या योजनेचा लाभ:-
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ देशातील 1 कोटी रूफ टॉप सोलार पॅनल घरांच्या छतावर बसवणार असून याचा मोठा फायदा गरजवंत लोकांना मिळणार आहे. तसेच या योजनेची घोषणा केल्यानंतर पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 07 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे व या 07 जिल्ह्यांना एकूण 01 लाख 75 हजार सोलार पॅनल बसवण्याचा निर्णय दिलेला आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, पुणे, अकोला व नागपूर या एकूण सात जिल्ह्यांना 01 लाख 75 सोलार पॅनल 31 मार्च पर्यंत बसवण्याचा प्रयत्न होणार आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ देशातील तसेच राज्यातील गरजवंत लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा त्यासाठी 54 हजार रुपये हे सोलार बसवण्यासाठी अनुदान जीले जाणार आहे. या अनुदानामुळे जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी जास्तीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद…