फक्त एका मिनिटात पाहा! सोयाबीन व कापुस 5000 रुपये अनुदान तुम्हाला मिळणार का? (सोयाबीन व कापुस अनुदान 5000 रुपये फक्त अश्या शेतकऱ्यांना मिळणार!
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस पिकासाठी हेक्टरी 5000 रुपये देण्यासाठी राज्य सरकारने GR काढला आहे. परंतु हे 5000 रुपये अनुदान मिळण्यासाठी सर्वात मोठी आट म्हणजे 2023 खरीप हंगामात सोयाबीन व कापुस पिकाची सातबाऱ्यावर ई पीक (E Pik) पाहणी नोंद असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही सोयाबीन व कापुस पिकाची पीक पेरा नोंद सातबाऱ्यावर ई पीक पाहणी ॲप द्वारे 2023 खरीप हंगामात केली असेल तर तुम्हाला हे पैसे आपोआप जमा होणार आहे.
शेतकऱ्यांना पडला मोठा प्रश्न :-
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामात सोयाबीन व कापुस पिकाची सातबाऱ्यावर लागवडीची नोंद केली की नाही हे आठवतच नाही. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठवत नसेल तरी अजिबात घाबरू नका तुम्ही 2023 खरीप हंगामात ई पीक पाहणी केली की नाही आपण फक्त जास्तीत जास्त दोन मिनिटात पाहणार आहोत.
टिप्स :- शेतकरी मित्रांनो 2024 खरीप हंगामासाठी ऑनलाईन ॲप द्वारे ई पीक पाहणी दिनांक/ 01 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला करता येणार आहे. 2024 खरीप हंगामाची ई पीक पाहणी करून घ्या म्हणजे तुम्हाला राज्यातील सर्व योजनेचा लाभ मिळेल.
• सोयाबीन व कापूस अनुदान किती?
शेतकरी मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला हेक्टरी 5000 रुपये दोन हेक्टर मर्यादित मिळणार आहे.
एकाच शेतकऱ्यांना 10000 रू अनुदान कसे मिळणार ?
भावांतर योजनेअंतर्गत कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत हेक्टरी 5000 रुपये अनुदान मिळणार आहे. समजा गेल्यावर्षी तुम्ही एक हेक्टर सोयाबीन पिकाची ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला 5000 रुपये मिळणार. कमीत कमी 20 गुंठे सोयाबीन किंव्हा कापूस पिकाची पीक पाहणी नोंद असेल तर 1000 रुपये मिळणार आहे. जर एक हेक्टर सोयाबीन व एक हेक्टर कापूस अशी नोंद असेल तर एकूण दोन्ही पिकाचे 10000 रुपये मिळणार आहे. किंव्हा फक्त दोन हेक्टर कापूस किंव्हा फक्त दोन हेक्टर सोयाबीन पिकाची नोंद असेल तरी तुम्हाला 10000 रुपये मिळणार आहे.
• गेल्या वर्षीची ई पीक पाहणी केली का नाही असे पाहा? स्टेप बाय स्टेप… (How to check e pik pahani 2023 list)
स्टेप 1 :- सर्व प्रथम “महाभुमी पोर्टल” वर जा..
स्टेप 2 :- त्यांनतर “डिजिटली 7/12, 8 अ फेरफार डाऊनलोड” या ठिकाणी क्लिक करा.
स्टेप 3 :- तुम्हाला तुमचा यूजर आयडी, पासवर्ड विचारला जाईल त्यांनतर Captcha टाकून समोर जा.
स्टेप 4 :- 7/12 डाऊनलोड करायचा म्हणून यावर क्लिक करा.
स्टेप 5 :- त्यांनतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव व गट नंबर विचारला जाईल तो भरून घ्या.
स्टेप 6 :- गेल्या वर्षीचा ई पीक पाहणी डाटा यावर क्लिक करा.
स्टेप 7 :- तुमचा 7/12 डाऊनलोड करा आणि पहा गेल्यावर्षी सोयाबीन व कापुस पिकाची किती हेक्टरी ई पीक पाहणी पीक पेरा नोंद केली.
शेतकरी मित्रांनो अगदी सोप्या भाषेत तुम्हाला माहिती दिली आहे. अश्याच नवनवीन माहितीसाठी व्हायरल फार्मिंग संकेतस्थळावर भेट द्या व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद…