फक्त 0 रुपयात हरळी तन शेतातून नष्ट करण्यासाठी देशी जुगाड!

Hariyali Weed Control:- (Cynodon dactylon वैज्ञानिक नाव आहे) तुमच्या शेतात हरियाली गवताचे प्रमाण अधिक असेल व हरियाली गवत तणनाशकांचा वापर करूनही नियंत्रणात येत नसेल तर अगदी झीरो रुपयात तुम्ही हे देशी जुगाड वापरून हरियाली गवताचे योग्य व्यवस्थापन करू शकता.

हरळी तन नियंत्रण देशी जुगाड
हरळी गवत नष्ट करण्यासाठी शेतातील भुस उपयुक्त ठरणार फक्त 15 दिवसात हरळी गवत शेतातून कायमस्वरूपी नष्ट करा तेही अगदी झीरो रुपयात!

शेतकरी बंधूंनो राम राम व्हायरल फार्मिंग (Viral Farming) या संकेतस्थळावर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो हरियाली (दुर्वा) हे गवत वर्षभर दिसून येणार गवत आहे. या गवताचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या पिकाच्या वाढीसाठी अनेक अडथळे निर्माण होतात. आपल्या पिकांची वाढ कमी होते फुटवे कमी लागतात कारण आपण पिकासाठी दिलेले खत आपल्या शेतात असलेली हरियाली स्वतः शोषण करून घेते त्यामुळे आपल्या पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्य पुरवठा व्यवस्थित होत नाही.

तसेच हरियाली (दुर्वा) गवताचे प्रमाण अधिक वाढल्यानंतर आपल्या पिकात रस शोषण (Sucking Pest) करणाऱ्या किडिंचा प्रादुर्भाव वाढतो पिके पिवळी पडतात त्यामुळे योग्य वेळी हरियाली गवताचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक शेतकरी बांधवांचा शेतात वर्षभर हरियाली गवताचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे शेतकरी या गवताचे व्यवस्थापन करण्यासाठी शक्यतो खुरपणी (Hand weeding) करतात किंव्हा तणनाशकांचा (Herbicide use) वापर करून हरियाली गवत नष्ट (Control) करण्याचा विचार करतात. तरीही हरियाली गवत आपल्या शेतातून कायमसोरुपी नष्ट होत नाही त्यांचे प्रमुख कारण म्हणजे आपण या गवताला मुळा पासून नष्ट करत नाही.

शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात कायमसोरूपी येणाऱ्या हरियाली गवता पासून 100 टक्के सुटका करायचा असेल तर त्या हरियाली गवताला मुळा पासून नष्ट करणे गरजेचे आहे. हरियाली गवत मुळा पासून नष्ट करण्यासाठी तुम्ही हे जुगाड करू शकता. पुन्हा अनेक वर्ष तुमच्या शेतात हरियाली गवत होणार नाही.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात जे काही गहू पिकाचे भूस (Wheat straw) असेल किंव्हा ज्वारी पिकाचे भुस (Jowar straw) असेल किंव्हा तुरीचे भुस असेल (Tur straw) तर ते भुस तुम्हाला तुमच्या शेतात ज्या ठिकाणी हरियाली गवताचे प्रमाण अधिक वाढले आहे, अश्या ठिकाणी हरियाली गवतावर ते भुस पसरून तुम्हाला ते गवत पूर्ण पने झाकून घ्याचे आहे.

मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी आपण भुस जमा (Sraw hill) करतो त्या ठिकाणी भुस उचलत असतानी आपल्याला उष्ण गर्मी जाणवते. याचमुळे मित्रांनो ज्या ठिकाणी हरियाली गवताचे प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी त्या गवतावर भूस अंथरून घ्यायचे आहे. मित्रांनो आपल्याला त्या हरियाली गवतावर अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्मी निर्माण करायचे आहे त्या गर्मी मुळे जे हरियाली गवताचे मूळ आहेत त्या मुळा त्या गर्मीने कायमस्वरूपी नष्ट होतील कायमस्वरूपी मरतील जेणेकरून आपल्या शेतामध्ये पुन्हा हरियालीचे प्रमाण वाढणार नाही. त्यामुळे मित्रांनो आपल्याला असे जुगाड वापरून हरियाली व्यवस्थापन करायचे आहे.

शेतकरी मित्रांनो कारण तुम्ही खुरपणी किंव्हा तणनाशकांचा वापर करून हरियाली गवताचे नायनाट कायमस्वरूपी करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी उष्ण गर्मी निर्माण करून हरियाली गवताच्या मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी करू शकता. त्याची उगवण क्षमता कमी करू शकता. मित्रांनो कसे वाटले जुगाड नक्की सांगा धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *