बापरे 5 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस! सूर्यदर्शन देखील होणार पंजाब डख..
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 30 जुलै रोजी हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला आहे. राज्यात 5 ऑगस्टपर्यंत कसा असेल पाऊस? कोणत्या भागात जोरदार? कुठे सूर्यदर्शन? सर्व माहिती या लेखात पाहू..
नमस्कार मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतीविषयक व हवामान विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
पंजाब डख यांनी दिनांक/ 5 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून ज्या भागात ऊन पडणार आहे अश्या भागात अर्धा ते एक तासाचा शेतातून पाणी निघेल असा जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे. ज्या भागात ऊन त्या भागात जोरदार पाऊस पंजाब डख.
दिनांक/ 31 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान राज्यात भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे विशेष ज्या भागात ऊन अधिक राहील त्या भागात शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस होणार आहे, त्यामुळे जसी उघडीप मिळेल शेतीचे काम पूर्ण करून घ्यावे असा सल्ला डख यांनी दिला आहे.
राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, सिलोड, सिंदखेड राजा, नाशिक, जळगाव, मालेगाव, इगतपुरी, नंदुरबार आणि धुळे या भागात दिनांक/ 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. इतर भागात मात्र भाग बदलत जोरदार पाऊस होणार आहे. पाऊस कमी वेळ असेल परंतु जोरदार असेल आता रिमझिम पाऊस थांबला आहे. काही भागात सूर्यदर्शन होईल वेळ मिळेल त्यानुसार कीटकनाशक फवारणी करून घ्यावी.
राज्यातील ऑगस्ट महिन्यातही पाऊस भाग बदलत चालूच राहणार आहे खंड वगेरे पडणार नाही अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. ज्या महिन्यात 20 दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस पडत नाही अश्या महिन्यात खंड गृहीत धरला जातो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही चार पाच दिवसाची विश्रांती असेल परंतु खंड नाही अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…