बापरे; पावसाचा मुक्काम वाढला पंजाब डख यांचा नवीन अंदाज जाहीर..! Panjab Dakh Live.
व्हायरल फार्मिंग : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मनातले लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दिनांक/ 27 जुलै रोजी नवीन अंदाज जाहीर केला असून, पावसाचा मुक्काम वाढल्याची माहिती दिली आहे. पंजाब डख यांचा नवीन अंदाजानुसार राज्यात कसा असेल पाऊस? पाऊस किती दिवस राहणार? कोणत्या भागात मुसळधार? कोणत्या भागात मध्यम? सर्व माहिती डख यांनी दिली असून या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहू.
पंजाबराव डख यांनी स्वतःच्या गावातील धुळपेरनी केलेल्या कापूस प्लॉट मध्ये उभा राहून नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे, आज दिनांक/ 27 जुलै ते 30 जुलै राज्यात जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 30 जुलै पर्यंत पावसाचा होत सर्वाधिक राहणार असून दररोज भाग बदलत वेग वेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी जसी वेळ मिळेल तसे फवारणी करावी असा सल्ला डख साहेबांनी दिला आहे. कारण आज पासून पुढील चार दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.
आज दिनांक/ 27 जुलै पासून ते 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, काही भागात जोरदार, काही भागात रिमझिम तर काही भागात अतिवृष्टी पाऊस होणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
• दिनांक/ 5 ऑगस्ट पर्यंत वापसा नाही..
पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 5 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून राज्यातील काही भागात वापसा होणार नाही, त्यामुळे जसी वेळ मिळेल तसे फवारणी करून घ्या कारण सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
पंजाब डख म्हणतात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच राज्यातील सर्व धरणे भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे धन्यवाद..
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…