Honey bees village yojana: मधाचे गाव योजना..
मधाचे गाव योजना काय आहे. या योजनेचा लाभ कोन्हाला मिळणार. या योजनेचे उद्देश काय आहे सविस्तर माहिती घेऊ…
दिनांक – 05 फेब्रुवारी रोजी मधमाशी पालन करण्यासाठी मधाचे गाव या योजनेला मान्यता मिळाली असून ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. नुकत्याच मंत्री मंडळात झालेल्या बैठकीत मधाचे गाव योजना राज्यभर राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
मधाचे गाव या योजनेचा लाभ सर्वाधिक युवा उद्योजकांना मिळणार आहे. ज्या गावांमध्ये जंगलाचे प्रमाण अधिक आहे अश्या गावांना अधिक प्राधान्य मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो आपण वाढवलेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर मध माशांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमुख कारण आहे त्यामुळे निसर्गाचे जीवनक्रम ही बिघडला आहे. हा निसर्गाचा जीवनक्रम संतुलित ठेवण्यासाठी मधाचे गाव ही योजना जंगल भागातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे.
मधाचे गाव योजनेचा हेतू:-
– जंगली भागातील गावांना रोजगार मिळण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
– नवीन युवा उद्योजकांना सुद्ध मध उत्पादक करता येणार आहे.
– झाडांची लागवड वाढून रोजगार मिळणार आहे.
– निसर्गाचे आरोग्य धोक्यात येऊ नये त्यासाठी मध माशी संगोपन वाढणार आहे.
– डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मधुमधी पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
– मधुमाशी पालन केल्यामुळे पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
– राणी मधमाशी पैदास उपक्रम राबविले जाणार आहे.
जंगली व डोंगराळ भागातील गावांना अधिक प्राधान्य असून मधुमशी संगोपनाची प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही योजना पीक उत्पादन वाढीसाठी व निसर्गाची अन्नसाखळी व्यवस्थित ठेवण्यासाठी ही योजना सक्षम ठरणार आहे. तसेच मधपेटी तयार करणाऱ्यांना 20 टक्के तर शासनाचा 80 टक्के हिस्सा असणार आहे.
ज्या गावात मधूमाशी पालन करण्यासाठी अनुकूल वातावरण असेल अश्या गावाची निवड सर्व प्रथम पहिल्याच टप्प्यात करणार आहे. ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव जिल्हा ग्राम उद्योज अधिकाऱ्यांचा मार्फत जिल्हाअधिकाऱ्यांचा समितीला सादर करावा लागणार आहे धन्यवाद…