महा डीबीटी देणार 100% अनुदानावर कापूस वेचणी बॅग अर्ज सुरू? Kapus Vechni Bag Yojana Online Application..
व्हायरल फार्मिंग :- महा डीबीटी पोर्टलवर 100 टक्के अनुदानावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी एकूण 8 बॅग. कापूस वेचणी व साठवणूक करण्यासाठी हेक्टरी एकूण आठ बॅग देण्याचा निर्णय महा डीबीटी ने घेतला आहे. त्यामुळे आता महा डीबीटी संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. कापूस वेचणी बॅग साठी महा डीबीटी वर अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती घेऊ. (How To Apply Online Application For Cotton Picking Storage Bags)..
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती व हवामान विषयक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.
Maha DBT Gives 100% Subsidy On Cotton Picking/Storage Bags :- राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर महा डीबीटी 100 टक्के अनुदानावर कापूस वेचणी/साठवणूक बॅग पात्र शेतकऱ्यांना देणार असून ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले आहे. या योजनेचा सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा महा डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी सहभाग घ्यावा…
• कापूस वेचणी व साठवणूक :-
कापूस वेचणी आणि साठवणूक करण्यासाठी अनेक वेळा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बॅग ऐनवेळी शोधाव्या लागतात, परंतु वेळेवर बॅग न मिळाल्यामुळे कापूस पावसाने भिजणे किंवा साठवणूक न झाल्यामुळे कापूस खराब होणे अशा अनेक समस्या दिसून येतात, त्यामुळे या समस्यावर आळा घालण्यासाठी महा डीबीटी द्वारे हेक्टरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण संख्या 8 बॅग कापूस वेचणी साठी मिळणार आहे. त्यासाठी अर्ज देखील सुरू झाले असून 100% अनुदानावर म्हणजे पात्र शेतकऱ्यांना फ्री कापूस वेचणी बॅग मिळणार आहे.
• कापूस वेचणी बॅग ऑनलाईन अर्ज कसा करावा? Maha DBT Kapus Vechni Bag Yojana Online Application :-
स्टेप 1 :- महा डीबीटी पोर्टल वर जाऊन ID/Password/Captcha टाकून Login करून घ्यावे.
स्टेप 2 :- लॉगिन झाल्यानंतर “अर्ज करा” यावर क्लिक करून समोर जावे.
स्टेप 3 :- तीन नंबर चे ऑप्शन “बियाणे, औषधे व खते” यासमोरील “बाबी निवडा” यावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4 :- त्यांनतर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल जसे की गाव, तालुका, गट क्रमांक, हेक्टरी क्षेत्र, वान निवडा व पीक निवडा सर्व माहिती अचूक भरून घ्या.
स्टेप 5 :- त्यानंतर “जतन करा” नावाने हिरवी पट्टी आहे त्यावर क्लिक करा.
स्टेप 6 :- त्यानंतर अर्ज सादर करावे.
तर शेतकरी मित्रांनो सर्व अचूक माहिती तुम्हाला दिली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा कारण कापूस वेचणी साठी हेक्टरी 100 टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यांना एकूण आठ कापूस वेचणी बॅग मिळणार आहे धन्यवाद…..