मान्सून 2024 सुपर अल निनो बद्दल सर्वात मोठा अंदाज

मान्सून 2024 सुपर अल निनो बद्दल सर्वात मोठा अंदाज:-

2024 मध्ये दुष्काळ आहे का
मान्सून 2024 सुपर अल निनो बद्दल सर्वात मोठा अंदाज

शेतकरी मित्रांनो 2023 वर्ष हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण वर्ष ठरलेले आहे, पावसाने दिलेला मोठा खंड आणि सोयाबीन कापूस उत्पादन झालेली मोठी घट, तसेच कापसाला व सोयाबीन ला मिळत असलेला कमी बाजार भाव यामुळे देशातील  शेतकरी खूपच अडचणीत सापडलेला आहे. आणि त्यातच सुपर अल निनोचा प्रभाव वाढून 2024 मध्ये दुष्काळ पडणार असल्याची बातमी झपाट्याने पसरत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पण त्यातच नोआ हवामान संस्थाने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
वर्ष 2024 मान्सून हंगामात सुपर अल निनोचा धोका कमी होण्याची शक्यता, देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, प्रशांत महासागरातील पुष्टभागाचे तापमान (Surface Temperature) कमी होत असून सुपर अल निनोचा प्रभाव संपणार असल्याची माहिती अमेरिकन हवामान संस्था नोआ (NOAA- National Oceanic and Atmospheric Administration) ने वर्तवली आहे.

मान्सून 2024 latest update:-

शेतकरी मित्रांनो दिलासादायक बातमी प्रशांत महासागरातील पुष्टभागावरील तापमान घसरले सुपर अल निनोचा प्रभाव होणार कमी त्यामुळे 2024 मध्ये सुध्दा चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता अमेरिकन हवामान संस्था नोआ (NOAA) ने वर्तवली आहे.
वर्ष 2023 मध्ये प्रशांत महासागरात वाढलेला सुपर अल निनोचा प्रभाव आणि मोठा पडलेला पावसाचा खंड देशातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरलेला आहे. त्यामुळे सुपर अल निनो नाव जरी ऐकले तरी या वर्षी दुष्काळ पडतो की काय असा प्रश्न पडतो.
सुपर अल निनोचा प्रभाव वाढला की दुष्काळ पडण्याची शक्यता असते आणि मान्सून काळात जर ला निना सक्रिय झाला तर देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता असते.
परंतु आता प्रशांत महासागरात तापमान कमी झाल्यामुळे अल निनोचा प्रभाव कमी होत आहे अशी माहिती अमेरिकन हवामान संस्था नोआ (NOAA) ने व्यक्त केली आहे.
अमेरिकन हवामान संस्था नोआ (NOAA) ने देशातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे की प्रशांत महासागरातील तापमान कमी झाल्यामुळे अल निनोचा प्रभाव कमी होऊन 2024 मान्सून काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो अमेरिकन हवामान संस्था नोआ ने 2024 मान्सून अंदाज वर्तवला आहे आता IMD (Indian Meteorological Department) भारतीय हवामान खात्याकडून काय अंदाज येतो याकडे सर्व देशातील शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *