मार्च ते मे महिन्यात कापूस 10 हजार होणार का? कापूस विक्री कशी करावी

Cotton rate:- मार्च महिन्यात कापूस भाव कमी जास्त होने सतत चालू राहील कारण मागील 15 दिवसात कापूस अचानक जंप घेऊन 6600 रुपये विकणार फरदड कापूस 7000 रुपये पर्यंत पोहचला आहे तर चांगल्या क्वालिटी कापसाच्या दरात मागील 15 दिवसात अचानक वाढ होऊन 900 ते 1200 प्रति क्विंटल भाव वाढले आहे.

कापूस भाव
Cotton rate:- मार्च महिन्यात कापूस भाव कमी जास्त होने सतत चालू राहील कारण मागील 15 दिवसात कापूस अचानक जंप घेऊन 6600 रुपये विकणार फरदड कापूस 7000 रुपये पर्यंत पोहचला आहे तर चांगल्या क्वालिटी कापसाच्या दरात मागील 15 दिवसात अचानक वाढ होऊन 900 ते 1200 प्रति क्विंटल भाव वाढले आहे.

मागील 15 दिवसात 7000 रुपये प्रति क्विंटल विकणारा नंबर एक क्वालिटी कापसाला आता मात्र सरासरी 7500 पासून 8200 पर्यंत भाव मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या बाजार समिती मध्ये चांगल्या धाग्याचा कापसाला 8100 रुपये असा भाव मिळत आहे. देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये 7000 रुपये पासून 7900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे.

किरकोळ बाजारात मात्र एक नंबर क्वालिटी कापसाला 7500 ते 7700 रुपये असा भाव मिळत आहे. कापूस भाव कापसाच्या क्वालिटी वर अवलंबून आहे.
भिजलेला कापूस, कमी धाग्यांचा कापूस, पिवळा पडलेला कापूस व लांब धाग्यांचा कापूस या कापसाच्या क्वालिटी नुसार सध्या बाजारात कापसाला भाव मिळत आहे.

मार्च महिन्यात कापसाचे भाव कसे राहतील:-

मार्च महिन्यात सुरुवातीपासूनच कापसाच्या भावात वाढ दिसून येत आहे. ही अचानक झालेली वाढ कमी जास्त भाव होत आहे. अचानक वाढ झालेल्या कापूस भावात कमी जास्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी घाई करू नये. कापूस टप्यात विक्री करणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुरडेल असा सल्ला कापूस उत्पादक व्यापाऱ्यांनी दिला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे त्यामुळे पुढील काळात जागतिक पातळीवर कापसाची मागणी वाढल्यास कापूस दर वाढण्याची शक्यता अधिक दिसून येऊ शकतो असा अंदाज कापूस तज्ञांचा आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंव्हा एप्रिल मे मध्ये कापसाचे बाजार भाव 8500 ते 9000 रुपये होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु हा अंदाज अवलंबून असतो कापूस उत्पादक कसे आहे, जागतिक बाजारात मागणी कशी आहे, भारतीय बाजारात कापसाचा साठा कसा आहे या गोष्टीवर कापूस भाव पुढील काळात वाढतील की पडतील सर्व गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वपणे कापूस भाव वाढीच्या अंदाजावर अवलंबून न राहता कापूस विक्रीचा निर्णय आपण आपला घ्यावा. शक्यतो कापूस टप्पा टप्यात विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किंव्हा गावातील साठा केलेल्या कापूस व्यापाऱ्यांनी कापूस भाव भविष्यात 10 हजार होतील या आशेने कापूस पूर्ण साठून ठेवणे योग्य ठरेल असे नाही त्यामुळे कापूस टप्यात विक्री कधीही फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *