महाराष्ट्र राज्यातील नोव्हेंबर 2023 नुकसान भरपाई जाहीर:-
शेतकरी मित्रांनो राम राम 2023 वर्षाचा शेवटी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्यातील एकूण 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने नोव्हेंबर 2023 नुकसान भरपाई मदत जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने राज्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
राज्य सरकारने 01 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 3 हेक्टर मर्यादेत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे शासन नुकसान भरपाई मदन देणार आहे.
तसेच राज्यातील बागायत पिकाच्या नुकसानीसाठी शासन शेतकऱ्यांना 3 हेक्टरी मर्यादा ठेऊन 27 हजार रुपये प्रति हेक्टर या वाढीव दनारे नुकसान भरपाई मदत देणार आहे.
तसेच राज्यातील बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी शासन शेतकऱ्यांना 3 हेक्टर ची मर्यादा ठेऊन 36 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मदत देणार आहे.
म्हणजे राज्य सरकारने नोव्हेंबर 2023 नुकसान भरपाई मदत देण्यासाठी 3 हेक्टर ची वाढीव मर्यादा ठेऊन वरील सांगितल्या प्रमाणे वाढीव दर देखील जाहीर केला आहे.
नोव्हेंबर 2023 नुकसान भरपाई मदत खालील जिल्ह्यांना मिळणार आहे :-
विदर्भ विभागातील वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया.
तसेच मराठवाडा विभागात जालना, छञपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव व नांदेड वरील या नोव्हेंबर मध्ये नुकसान झालेल्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.
तसेच मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर 2023 नुकसान भरपाई मदत मिळणार आहे धन्यवाद….