Mukhaymantri Annapurna Yojana 2024; महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तीन गॅस सिलेंडर (Three Gas Cylinder Free) मिळणार मोफत. कोण असणार पात्र? कोणत्या कुटुंबांना मिळणार लाभ? पाहा संपूर्ण माहिती…
राज्यातील अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक (Cooking) करावा लागतो त्यामुळे अनेक महिलांच्या डोळ्यावर धुरामुळे (Smoke) वाईट परिमाण होतो आणि डोळ्याच्या (Eye Problems) अनेक समस्या महिलांना उद्भवतात त्यामुळे आता राज्य सरकार राज्यातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाक (Smoke Free Cooking) करता यावा त्यासाठी वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर (Gas Cylinder Refill Free) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देणार आहे.
चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना धुरामुळे अनेक आरोग्यावर दुष्परिणाम होतात, या कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या योजनेचा हेतू आहे. दिनांक/ 30 जुलै 2024 रोजी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस (Three Gas Cylinder Refill Free) सिलेंडर पुनर्भरण (Refill) मोफत (Free) उपलब्ध करून देणेबाबत नवीन जीआर (GR) आज 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
गरीब कुटुंबातील गॅस जोडणी असलेल्या महिलांना काही आर्थिक अडचणीमुळे पुन्हा गॅस पुनर्भरण (Refill) करणे शक्य होत नाही, त्यामुळे या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण (Refill) करून देण्यात येणार आहे.
गरीब कुटुंबातील महिलांना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे अनेक वेळा या कुटुंबातील लाभार्थी महिलांना गॅस भरून घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही.
त्यामुळे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते आणि पर्यावरणाला हनी होते त्यामुळे पर्यावरण सुरळीत ठेवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची थरनार आहे.
• मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हेतू काय?
गरीब कुटुंबातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे धुरामुळे डोळे खराब होऊ नये तसेच इंधनासाठी वृक्षतोड होऊ नये व पर्यावरण सुरक्षित राहावे त्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
• लाभ :- (पात्रता)
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत मिळणार आहे त्यासाठी ज्यात महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे अश्या कुटुंबातील महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर पुनर्भरण मिळणार आहे. म्हणजे राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे अश्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस असणे गरजेचे आहे. त्याबरोबर ज्या महिला प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र आहे अशा महिलांना देखील तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहे अश्या कुटुंबातील महिलांना देखील तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन महिलांना मिळणार आहे, परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत रेशन कार्ड वरील एकाच लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…