बांबू लागवड करण्यासाठी हेक्टरी 7 लाखाचे अनुदान:-
शेतकरी मित्रांनो नैसर्गिक संकटामुळे राज्यात बांबू लागवड करणे खूपच काळजी गरज आहे. बांबू लागवड पासून अनेक फायदे होतात. कोरोना काळात ऑक्सिजन (प्राणवायू) चे महत्व आपल्याला समजलेच आहे त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बांबू लागवड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
बांबू पासून सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा होतो, पशा पटेल म्हणतात जगायचे असेल तर बांबू लागवड काळाची गरज आहे त्यामुळे परतेक शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एकर तरी बांबूची लागवड केली पाहिजे. बांबू लागवड करण्यासाठी खर्च खूप कमी आहे या पिकाला फवारणी किंव्हा खताची जास्त मात्रा लागत नाही त्यामुळे खर्च ही कमी होतो.
केंद्र व राज्य शासनाचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्यात एकूण 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करणार असल्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यासाठी हेक्टरी तब्बल 7 लाखाचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानाची मंजुरी फक्त 7 दिवसात होणार असून शेतकऱ्यांचा बांबू लागवड करण्यासाठी कल वाढवा हा शासनाचा हेतू आहे.
मित्रांनो गेल्या काही वर्षात अनेक नैसर्गिक संकटे आपल्याला बघायला मिळाली आहेत त्याच नैसर्गिक संकटांना भविष्यात तोंड देण्यासाठी बांबू लागवड अत्यंत गरजेची आहे. बांबू लागवडी पासून जवळपास 1800 प्रकारचे उत्पादने तयार होतात त्यामुळे बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
लांबी लागवडीमुळे वातावरणातील कार्बन कमी होऊन बांबू मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करते त्यामुळे बांबू लागवड करण्यासाठी हेक्टरी 7 लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बांबू लागवडी पासून जवळपास 1800 उत्पादने तयार होतात दगडी कोळशाला पर्याय इंधन म्हणून तसेच इथेनॉल निर्मितीसाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे याचं हेतूने राज्य सरकार हेक्टरी बांबू लागवडीसाठी तब्बल 7 लाखाचे अनुदान देणार आहे.
बांबू पिकावर कोणताही रोग किंव्हा किड पडत नाही त्यामुळे या पिकावर होणारा खर्च ही खूपच कमी असल्याची माहिती बांबू लागवड प्रगतशील शेतकऱ्यांनी दिली आहे. बांबू लागवडी साठी टिश्यू कल्चर चे रोग निवडावे या पिकाला वर्षातून एकदाच खताची गरज पडते. बांबू लागवड करण्यासाठी बांबुसा या वाणाची निवड प्रामुख्याने राज्यात केली जाते. बांबुसा ही जात उंच व सरळ वाढत असल्यामुळे या वानाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे.
शेतकरी मित्रांनो शेती विषयक माहिती व बाजार भाव माहिती साठी नक्की भेट दया धन्यवाद…