Dushkal nidhi:- दुष्काळी मदत- राज्यातील या 40 तालुक्यांना मिळणार दुष्काळी मदत!
नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्ष 2023 खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. खरीप 2023 वर्षात झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
राज्यात एकूण 40 तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा बँक खात्यात दुष्काळी मदत जमा केली जाणार आहे. शासन निर्णय gr मध्ये नमूद करण्यात आलेल्या एकूण 40 तालुक्यात शेतकऱ्यांना दुष्काळ निधी वितरित करण्यात येणार आहे. या दुष्काळ निधीसाठी एक 40 तालुके कोणते पात्र आहेत त्या तालुक्यांचे नावे देखील आपण पाहणार आहेत तुमचा तालुका आहे की नाही खाली सविस्तर माहिती वाचा.
दिनांक – 09/11/2023 च्या शासन निर्णय नुसार खरीप जुन 2023 ते ऑक्टोंबर 2023 या दरम्यान अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीकरिता 03 हेक्टर पर्यंत मदत करण्यात आलेली आहे.
2023 दुष्काळ निधी किती:-
शेतकरी मित्रांनो वर्ष 2023 खरीप हंगाम करिता राज्यातील एकूण 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये दुष्काळी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याचा आली आहे.
राज्यातील एकूण 40 तालुक्यातील दुष्काळग्रस्त बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वरील निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
दुष्काळी मदत वितरित करण्यासाठी एकूण 40 तालुके:-
राज्यातील दुष्काळग्रस्त एकूण 40 तालुक्यांना लवकरात लवकर सरकारकडून शेतकऱ्यांचा बँक खात्यात मदत दिली जाणार आहे.
1- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 101912 बाधित शेतकऱ्यांना एकूण 10892.33 रुपये लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
2- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण 85865 बाधित शेतकऱ्यांची संख्या असून 7581.05 रुपये लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
3- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एकूण 63898 बाधित शेतकऱ्यांची संख्या असून 6333.10 रुपये लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
4- धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 67492 असून त्यासाठी एकूण 8647.80 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
5- नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 51258 असून त्यासाठी एकूण 6885.42 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
6- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 84471 असून त्यासाठी एकूण 13319.80 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
7- बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 55844 असून त्यासाठी एकूण 4985.78 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
8- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 70084 असून त्यासाठी एकूण 4744.78 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
9- छ. संभाजीनगर जिल्ह्यातील छ. संभाजीनगर तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 102515 असून त्यासाठी एकूण 8174.43 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
10- छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या 33818 असून त्यासाठी एकूण 3581.38 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
11- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बाधित संख्या 109680 एकूण निधी मंजूर 9233.35 रुपये लक्ष.
12- जालना जिल्ह्यातील जालना तालुका बाधित संख्या 91492 एकूण निधी मंजूर 7909.90 रुपये लक्ष.
13- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाधित 49510 संख्या एकूण निधी मंजूर 5190.65 रुपये लक्ष.
14- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बाधित 97728 संख्या एकूण निधी मंजूर 11094.69 रुपये लक्ष.
15- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बाधित 58847 संख्या एकूण निधी मंजूर 4793.10 रुपये लक्ष.
16- बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बाधित 33529 संख्या एकूण निधी मंजूर 2800.33 रुपये लक्ष.
17- बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बाधित 43304 संख्या एकूण निधी मंजूर 3539.03 रुपये लक्ष.
18- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बाधित 72170 संख्या एकूण निधी मंजूर 6591.95 रुपये लक्ष.
19- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाधित 49510 संख्या एकूण निधी मंजूर 5190.65 रुपये लक्ष.
20- धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लेहारा तालुक्यात निधी मंजूर.
21- पुणे जिल्ह्यातील एकूण पुरंदर सासवड, बारामती, शिरूर घोडनदी, दौंड, इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर.
22- सोलापूर जिल्ह्यात एकूण बार्शी, माळशिरस, सांगोली, करमाळा, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर.
23- सातारा जिल्ह्यातील एकूण वाई, खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर.
24- कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर.
25- सांगली जिल्ह्यात शिराळा, कडेगांव, खानापूर विटा, मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर धन्यवाद.