Cold wave decreased:- राज्यातील थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून इशारा.
शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचे प्रमाण खूपच वाढले होते त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण त्यातच एक आनंदाची बातमी म्हणजे पुढील काही दिवस राज्यातील थंडी कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिण्यात आली आहे.
राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे थंडी कमी झाल्याचे जाणवत आहे. तसेच उत्तरेकडून वाहणारे थंड वारे देखील कमी झाल्यामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. आता किमान तापमानाचा पारा वाढत आहे त्यामुळे थंडी कमी होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मराठवाड्यात पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहून थंडी कमी होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून थंडी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
किमान तापमानात काही अंश सेल्सिअस घट झालेली दिसून आहे त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मराठवाड्यातील छञपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 15.5 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 16.2 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातील किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअस ने वाढ झाल्यामुळे थंडी कमी होणार असल्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद…