Today weather update:- आज दिनांक 25 फेब्रुवारी पावसासाठी पोषण वातावरण तयार होत असून विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Today havaman andaj:- विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट चा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा व अकोला या विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यात विजांचा कडकडाट पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच नांदेड व हिंगोली या मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना विजांचा कडकडाट पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हरभरा व गहू काढणी सुरू असेल तर झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी.
शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात पावसासाठी पोषण वातावरण तयार होत असून 25 फेब्रुवारी रोजी विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. माराठवड्यातील दोन जिल्ह्यात म्हणजे नांदेड व हिंगोली या जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान तज्ञ खुळे साहेबांनी देखील पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली भागात ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील ढगाळ वातावरण तयार होऊन नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडा सोडता राज्यातील इतर कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही.
हवामान तज्ञ खुळे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पुढील तीन दिवस थोडे सतर्क राहावे असा इशारा आहे धन्यवाद…