Today weather forecast राज्यात पुढील पाच दिवस कड
शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील पाच दिवस कडाक्याची थंडी म्हणजे थंडी ची लाट (Cold vave) असणार आहे. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्तीची, लहान लेकरांची तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
दिनांक 16/01/2024 वार मंगळवार रोजी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर छ. संभाजीनगर जिल्ह्यात 9.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे, नाशिक जिल्ह्यात 9.8 अंश सेल्सिअस तर अहमदनगर जिल्ह्यात 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे.
Weather forecast today – पंजाबराव डख हवामान अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 16 ते 28 जानेवारी या दरम्यान पावसाची शक्यता नाही. दिनांक 16/ जानेवारी पासून राज्यातील बहुतांश भागात थंडीची लाट येणार असल्याची माहिती डख यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात पुढील काही दिवस तीव्र थंडीची लाट येणार असून गहू,हरभरा व तुर उत्पादन शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी तसेच सकाळी सकाळी धुई मोठ्या प्रमाणात पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी व्यक्त केली.
पंजाबराव डख सांगतात की हरियाणा व दिल्ली या भागात थंडीची लाट आलेली आहे व हे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीची लाट येणार असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे 17/ जानेवारी पासून ते 28/ जानेवारी पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज नाही त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा हरभरा किंव्हा तूर कधीच आली असेल तर काढून घ्यावी.
राज्यात जानेवारी महिन्यात प्रति थंडीची लाट असून वातावरण हे कोरडे राहणार आहे. दिवसा देखील थंडी जाणवणार आहे तसेच संपूर्ण जानेवारी महिन्यात थंडी असून पावसाची शक्यता नाही पंजाब डख.
शेतकरी मित्रांनो वातावरणीय बदल झाला की हवामान विषयक माहिती दिली जाईल धन्यवाद…