Ration Card:- रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी अगदी सोपी पद्धत संपूर्ण माहिती इथे पहा. ( How to add new family member name in Ration card).
Maharashtra State Women Scheme:- मित्रांनो राज्य सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक लाभ मिळावा त्यासाठी राज्य सरकारकडून नवनवीन योजना महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल यासारख्या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना घ्यायचा असेल तर त्या महिलेकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे रेशन कार्ड मध्ये त्या महिलांचे नाव असणे गरजेचे आहे.
मित्रांनो ही पोस्ट आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा तसेच आपला व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.
•लग्न झाले पण रेशन कार्ड मध्ये नाव नाही:-
आपल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर आपल्या घरी सून आली आणि खूप दिवस होऊनही त्या सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट केले नसेल तर अश्या महिलांना अनेक योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी रेशन कार्ड मध्ये सुनेचे किंव्हा नवीन झालेल्या बाळाचे नाव समाविष्ट करणे गरजेचे आहे. मंग सुनेचे नवीन नाव सासरकडील रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करायचे असेल तर सर्व प्रथम माहेरच्या रेशन कार्ड मधील नाव वघळणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व प्रथम ऑनलाईन नाव वघळून घेणे व नंतरच नवीन रेशन कार्ड मध्ये नाव नोदणी करणे गरजेचे आहे.
•रेशन कार्ड मध्ये नाव का असावे:-
रेशन कार्ड मध्ये आपले नाव समाविष्ट असेल तर आपल्याला राज्यातील तसेच देशातील सरकारी वेगवेगळ्या योजनेचे लाभ घेता येतात तसेच स्वस्त धान्य मिळवण्यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
• विवाहित मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे जोडावे?
विवाहित मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचे झाल्यास त्या मुलीचे लग्नाअगोदर तिच्या वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर सर्वप्रथम त्या रेशन कार्ड मधील नाव हेटवणे/वाघळणे गरजेचे आहे.
• रेशन कार्ड मधून नाव कसे कमी करावे :-
विवाहित मुलीचे लग्नाअगोदर वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये तिचे नाव समाविष्ट असेल तर सर्वप्रथम ते नाव हटवण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात भेट देऊन अन्न पुरवठा विभागाकडून नाव कमी करण्याचा दाखला तुम्हाला घेणे गरजेचे आहे त्या दाखल्यावर तुमच्या तालुक्यातील तहसीलदार सही शिक्का असावा. तुमच्या लग्नाअगोदर वडिलांच्या रेशन कार्ड मधील नाव कमी करून हा दाखला तुम्हाला दिला जाती. हा दाखला गहाळ झाल्यास पुन्हा मिळणार असल्याची सूचनाही या दाखल्यात दिलेली असते त्यामुळे दाखला घेतल्यावर सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
• विवाहित मुलीचे नाव जोडण्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
विवाहित मुलीचे नाव लग्न झाल्यानंतर सासर कडील रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागतात.
1- लग्नाअगोदर वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये असलेले नाव कमी केल्याचा दाखला असणे गरजेचे आहे.
2- ज्या रेशन कार्ड मध्ये विवाहित मुलीचे नवीन नाव जोडायचे आहे त्या रेशन कार्डची प्रत (झेरॉक्स) असणे गरजेचे आहे.
3- विवाहित मुलीचे नाव जोडायचे असेल तर त्या मुलीच्या नावासमोर नवऱ्याचे नाव असलेले आधार कार्ड गरजेचे आहे.
4- विवाहित मुलीचे नाव जोडण्यासाठी रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील जेवढे नाव समाविष्ट आहे त्यांचे आधार कार्ड प्रत (झेरॉक्स) लागणार आहे.
म्हणजे सर्वाचे आधार कार्ड झेरॉक्स, नाव कमी झाल्याचा दाखला, तसेच विवाहित मुलीचे आधार कार्ड झेरॉक्स, ज्या रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करायचे आहे त्या रेशन कार्ड चा झेरॉक्स हे सर्व कागदपत्र फाईल करून तुम्हाला तुमच्या म्हणजे सासरकडील तहसील कार्यालयात जाऊन अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करून नवीन नाव समाविष्ट कार्यासाठी अर्ज करायचा आहे.