Ladka Bhau Yojana:- लाडका भाऊ योजनेसाठी कोण होणार पात्र संपूर्ण माहिती पाहा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग गॅस संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. सध्या राज्यात लाडका भाऊ योजनेची घोषणा झाल्यानंतर लाडक्या भावाला या योजनेसाठी पात्र होणे गरजेचे आहे कोण होणार पात्र? काय आहेत अटी? संपूर्ण माहिती घेऊ.
लाडका भाऊ योजना ही राज्यातील युवकांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेअंतर्गत बारावी पास विद्यार्थ्यांना 6000 रुपये, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8000 रुपये तर पदवीधारकांना 10 हजार रुपये प्रति महिन्याला देण्यात येणार आहे. एकूण सहा महिने प्रशिक्षणाचा कालावधी असून या कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी, युवकांच्या आर्थिक मदतीसाठी ही योजना राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन या योजनेचा लाभ देणार आहे. लाडका भाऊ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आहेत.
• वय:- कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वयोगटातील युवकांना लाडका भाऊ योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• विद्यावेतन किती:-
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 6 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
डिप्लोमा पास झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 8 हजार रुपये मिळणार आहे.
पदवी पास झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 10 हजार रुपये मिळणार आहे.
• लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण कालावधी एकूण सहा महिन्याचा असणार आहे.
• नोंदणी:- लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने ची वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
• प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्याच का राज्य सरकार करणार आहे आणि 12 वी ते पदवीधारकांना वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पहा..