लाडकी बहिण योजनेसाठी कोणते बँक खते चालत नाही? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 बँक खाते संपूर्ण माहिती..
•बँक खाते-
लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील एका कुटुंबातील दोन महिलांना 1500 रुपये प्रति माह असे आर्थिक सहाय्य मिळणार आहे, त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुमचे बँक खते तुमच्या आधार सोबत लिंक असणे खूप गरजेचे आहे कारण या योजनेद्वारे देण्यात येणार पैसे हे थेट तुमच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा होणार आहे. तुमच्या बँक सोबत आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तसेच बंद पडलेले खते या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडू नये.
•अर्ज करण्याची तारीख :-
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली असून 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता, त्यामुळे तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्यावे तसेच बँक खते काही कारणामुळे बंद पडलेले असेल तर सर्व प्रथम सुरू करून घ्यावे त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करावा.
•लाडकी बहीण अर्ज कसा करावा?
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पैसे मागत असेल तर त्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करा. कारण राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना हा अर्ज करण्यासाठी प्रती फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना अर्ज करण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही तर तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून Nari Shakti Doot या मोबाईल ॲप द्वारे अर्ज करू शकता तसेच अंगणवाडी मध्ये जाऊन फ्री मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.
•उत्पन्न दाखला –
लाडकी बहीण योजनेसाठी घाई करू नका तारीख वाढवली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे किंव्हा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आट रद्द केली असून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी विनाकारण खर्च करू नका. सेतू केंद्र तुमची फसवणूक करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.