लाडक्या बहिणींनो तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर सर्वात पहिले हे काम करा तरच मिळणार बँक खात्यात पैसे.. (Ladki Bahin Yojana Adhar Bank Seeding Status Check Online)..
व्हायरल फार्मिंग :- दिनांक/ 01 जुलै पासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरला असेल व तुमचा फॉर्म Approved (मंजूर) झाला म्हणून मॅसेज आला असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे बँक खात्यात रक्षाबंधनाला म्हणजे दिनांक/ 19 ऑगस्ट 2024 रोजी मिळणार आहे, परंतु त्याअगोदर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होईल नाही तर होणार नाही याची सर्व महिलांनी काळजी घ्यावी. कारण या योजनेचे पैसे बँक खात्यात येणार असून तुमचे बँक आधार लिंक असणे गरजेचे आहे.
• लाडकी बहीण योजना काय आहे
मित्रांनो राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी अनेक अडथळे निर्माण झाले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रतेक पात्र महिलांना लाभ देणारच हा निर्णय घेतला आणि दिनांक/ 19 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे एकदाच तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अनेक महिलांचे फॉर्म मंजूर झाले असून, आता पात्र महिलांनी सर्वात पहिले आपले बँक खाते आधार कार्ड लिंक आहे का पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही खालील माहिती स्टेप बाय स्टेप वाचून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? तसेच कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे? लिंक नसेल तर लिंक कसे करावे? सर्व माहिती पाहा.
नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे सर्वप्रथम स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का असे पाहा..
स्टेप 1 :- आधार बँक खात्याशी लिंक आहे का पाहण्यासाठी आधार कार्ड अधिकृत वेबसाईट जावे.
स्टेप 2 :- त्यांनतर लॉगिन (Login) या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 :- त्यांनतर तुमचा आधार नंबर टाकून Captcha भरा व Login with OTP यावर क्लिक करा.
स्टेप 4 :- त्यांनतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावर एक OTP येईल.
स्टेप 5 :- आलेला OTP टाकून घ्या आणि Login (लॉगिन) करून घ्या.
स्टेप 6 :- Bank Seeding Status यावर क्लिक करा. तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल तर Active म्हणुन दाखवले जाईल.
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि त्यांना या योजनेसाठी मनुर (Approved) म्हणून मॅसेज आला असेल तर अश्या महिलांनी सर्वप्रथम आपले आधार बँक खात्याशी लिंक आहे का वरील माहिती प्रमाणे चेक करा जर बँक आधार लिंक नसेल तर सर्वप्रथम बँकेत जाऊन आधार बँक खात्याशी लिंक करून तरच तुम्हाला या योजनेचे पैसे बँक खात्यात DBT द्वारे येईल…