Mukhaymantri Vayoshri Yojana 2024:- (मुख्यमंत्री वयोश्री योजना)…
राम राम मित्रांनो राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी या योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार थेट बँकेत 3000 रुपये.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे हा निर्णय जेष्ठ नागरिकांसाठी उपयोगी ठरणार आहे. अडीअडचणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना एक मदत म्हणून ही योजना राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी काय आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय मर्यादा काय आहे, वार्षिक उत्पन्न किती असावे सर्व माहिती खाली सविस्तर बघणार आहोत.
मित्रांनो तुमच्या घरातील/कुटुंबातील ज्यांचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तीला या योजनेचा लाभ 3000 रुपये थेट बँक खात्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड आणि पास बुक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. DBT अंतर्गत थेट हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा, ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार देणार मोठा लाभ. मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार देणार 3 हजार रुपये. जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपयाचा लाभ.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तब्बल 480 कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारने दिली मान्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अध्येक्षे खाली मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2 लाख मर्यादित असून ज्येष्ठांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण सर्व जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास एकूण 1.5 कोटींच्या दरम्यान आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. त्यामुळे अपंगत्व पिडीत सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्फत जेष्ठ नागरीकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी द्वारे निवड करण्यात येईल पात्र जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांना एकरकमी एकूण तीन हजार रुपये लाभ त्यांचा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ:- जेष्ठ नागरिकांना अपंगत्व व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनःस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे धन्यवाद…