सोयाबीन भाव कधी वाढतील शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा:-
Soyabean rate:- शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढणी करून 4 महिने उलटले आहे तरी सोयाबीन भाव आजुन वाढलेले नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता खूपच चिंतेत पडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन साठवण करून ठेवले होते परंतु सोयाबीन काढणी करून अवघे 4 महिने उलटले आहे, तरी भाव मात्र 5,000 रुपये पेक्षा कमीच आहे त्यामुळे आता साठून ठेवलेली सोयाबीन विकायला काढल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आता मिळेल त्या भावात शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. सोयाबीनवर केलेला खर्च ही निघेल की नाही याचा भरवसा लागत नाही. कारण सोयाबीन पेरणी वेळेस पावसाने दिलेला मोठा खंड व सोयाबीन फुल अवस्थेत अवकाळी पाऊस सोयाबीन उत्पादन घटिमाघचे प्रमुख कारण आहेत.
सोयाबीन चे उत्पादन घटले म्हणून सोयाबीन भाव पुढील काही दिवसात वाढतील या अपेक्षेने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवण केली परंतु सोयाबीन भाव 4 महिन्या नंतर ही जैसे थे वैसे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी खूपच मोठ्या अडचणीत सापडलेला आहे.
यंदा सोयाबीन उत्पादनात कमालीची घट दिसून येत असल्यामुळे सोयाबीन भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु तेल आयात चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षांवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांनी हंगामात सोयाबीन काढणी केल्यानंतर सोयाबीन ला 4,500 ते 5,000 रुपय असा दर मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात सोयाबीन दर वाढीची अपेक्षा ठेऊन सोयाबीन साठवण केली. परंतु उलट 3 ते 4 महिने साठवण करूनही 5,000 रुपये पेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हिवाळी अधिवेशनात सोयाबीन भाव वाढीसाठी शेतकऱ्यांसह आंदोलन हे हिवाळी अधिवेशनात धडकले होते, परंतु सरकारने त्यावर तोडगा न काढल्यामुळे तिळमात्र ही फायदा सोयाबीन भाव वाढीसाठी या आंदोलनाचा दिसून आलेला नाही.
यंदा कमी पावसामुळे सोयाबीन पिकाची उशिरा पेरणी करावी लागली त्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. त्यातच सोयाबीन फुल अवस्थेत असताना पावसाची मोठा खंड दिला. येलो मोझाईक सारख्या रोगाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्लॉट उद्ध्वस्त झाले आणि सोयाबीन उत्पादन कमी झाले.
सोयाबीन उत्पादन कमी झाले म्हणून भाव तरी चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती कारण सोयाबीन बियाणे खरेदी खर्च, कीटकनाशक फवारणी खर्च, शेत मजुरांचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करता सध्या मिळत असलेला सोयाबीन भाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न पुरडणार आहे.
मित्रांनो सध्या जर तुम्ही सोयाबीन बाजार समितीचा भाव बघितला तर फक्त 4,500 ते 5,000 रुपये इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर सोयाबीन व कापूस भाव वाढीसाठी दिनांक 19/जानेवारी रोजी रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे धन्यवाद..