Weather Forecast; पूराचा धोका वाढला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कोकण आणि विदर्भात अती मुसळधार पाऊस!
Today Havaman Andaj 20 July 2024:- नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज दिनांक/ 20 जुलै आजचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत. आज कोणत्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस? कमी दाबाचा पट्टा कोणत्या जिल्ह्यात करणार प्रभाव? कोणत्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते? कोकण आणि विदर्भात कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट? संपूर्ण माहिती घेऊ.
आज 20 जुलै शनिवार रोजी पावसासाठी चांगलेच पोषक वातावरण निर्माण झाले आसुन, ओडिसा किनारपट्टी जवळ डिप्रेशन तयार झाले आहे लवकरच याचा प्रभाव महाराष्ट्र राज्यातील काही भागात मुसळधार ते अती मुसळधार असा दिसून येणारं आहे. गेल्या दोन दिवसापासून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच कोकणात मुसळधार पाऊस मागील दोन दिवसापासून बरसत आहे.
आज दिनांक/ 20 जुलै विदर्भ आणि कोकणात पूर परिस्थिती निर्माण करण्यासारखा मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
• आजचा हवामान अंदाज:-
आज दिनांक/ 20 जुलै बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच काही भागात मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.
विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
चंद्रपूर जिल्ह्यात आज रेड अलर्ट असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील जनतेने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा,.अमरावती जिल्ह्यात मुसळधार तर ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट असून जोरदार पावसाचा इशारा आहे.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचे ढग दाटून आले असून काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबई मध्ये पाऊस चालू असून आजही मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसरात, सातारा घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होणार असून पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे धन्यवाद..