सर्वात मोठी बातमी सोयाबीन व कापुस हेक्टरी 5000 रुपये अनुदानासाठी अर्ज सुरू! सर्वात अगोदर हे करा..

सर्वात मोठी बातमी सोयाबीन व कापुस हेक्टरी 5000 रुपये अनुदानासाठी अर्ज सुरू! सर्वात अगोदर हे करा..

सोयाबीन व कापूस अनुदान अर्ज सुरू
सर्वात मोठी बातमी सोयाबीन व कापुस हेक्टरी 5000 रुपये अनुदानासाठी अर्ज सुरू! सर्वात अगोदर हे करा..

व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्या आधार माहिती वापर करण्यासाठी सरकार पात्र शेतकऱ्यांचे संमती पत्र भरून घेणार आहे कारण सोयाबीन व कापुस अनुदान DBT द्वारे शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार असून आधार माहिती सरकारला वापरण्यासाठी संमती पत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असून कृषी सहाय्यक तुमचे अर्ज भरून घेणार आहे.

सोयाबीन व कापुस उत्पादकांना हेक्टरी 5000 रुपये देण्याचा निर्णय:-

राज्य सरकारने 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादकांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून दिनांक/ 29 जुलै रोजी या संदर्भात शासन निर्णय काढलेला आहे. तसेच आता आधार माहिती वापरण्यासाठी कृषी सहाय्यक कडून शेतकऱ्यांचे संमती पत्र भरून घेतले जाणार आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले त्यातच सोयाबीन व कापुस पिकास भाव कमी मिळाला अश्या अनेक कारणांमुळे आता राज्य सरकारने 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये म्हणजे दोन हेक्टर मर्यादित 10000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

अनुदान मर्यादा :-

2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादकांना दोन हेक्टर मर्यादित 5000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे.

पात्र शेतकरी :-

फक्त 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे त्यातच त्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस व सोयाबीन पिकाची ई पीक पाहणी पूर्ण केलेली असावी तर हे अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही मागील खरीप हंगामात ई पीक पाहणी केली नसेल तर या अनुदानाचा लाभ तुम्हाला घेता यनार नाही.

अनुदान रक्कम किती:-

वर्ष 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित अशी रक्कम मिळणार आहे.
हेक्टरी 5000 रुपये मिळणार असून दोन हेक्टर पर्यंत लाभ मिळणार आहे.
20 गुंठे पेक्षा कमी असल्यास कमीत कमी 1000 रुपये अनुदान मिळणार आहे.
वरील रक्कम 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक केली असेल तरच अनुदान मिळणार आहे.

सामायिक खातेदार :- या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सामायिक खातेदार असेल तर नाहरकत प्रमाणपत्र भरून द्यावे लागणार आहे. तरच सामायिक खातेदार शेतकऱ्यांचा एका नावावर हे अनुदान मिळेल.

आधार लिंक बँक खाते:-

वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन अनुदान हे थेट DBT द्वारे पात्र शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा असून शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे बंधनकारक आहे. तरच तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *