सोयाबीन काढणी ही चूक करू नका नुकसान होईल वेळीच सावध व्हा…
Soyabean Harvesting : शेतकरी मित्रांनो, 21 सप्टेंबर पासून राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाज लक्षात घेता शेतकरी सोयाबीन काढणी घाई गरबडीत करत आहेत. मात्र, सोयाबीन काढणी केल्यावर काही चुका शेतकऱ्यांनी करू नये. कोण कोणत्या चुका खाली माहिती पाहा..
1- नदी काठी जमीन :
दिनांक 21 सप्टेंबर पासून राज्यात अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, ज्यांचं शेत नदी काठी आहे अश्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी केल्यावर नदीच्या काठावर सोयाबीन गंजी घालू नये. नदी नाल्यांना पूर आल्यास सोयाबीन गंजी वाहून जाण्याचे प्रकार अनेक भागात घडलेले आहेत. नदी काठच्या शेतकऱ्यांनी नदी काठी सोयाबीन गंजी घालू नये, ज्या ठिकाणी शेतात पाणी साचत नाही त्या ठिकाणी गंजी घालावी.
2- सोयाबीन गंजीच्या बाजूने दांड पासून पाणी बाहेर काढण्याची सोय करावी..
सोयाबीन काढणी केल्यावर शेतात ज्या ठिकाणी उंच टेकाड आहे, अश्या ठिकाणी सोयाबीन गंजी घालून, ताडपत्रीच्या साह्याने झाकून घ्यावी व सोयाबीन गंजी खाली पाणी जाणार नाही त्यासाठी गंजीच्या बाजूने दांड पाडून पाणी गंजित न जाता बाहेर काढण्याची सोय करावी.
3- दिनांक 21 सप्टेंबर पर्यंत सोयाबीन काढणी करून घ्या
ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस आली आहे, त्या शेतकऱ्यांनी शक्यतो 21 सप्टेंबर अगोदर सोयाबीन कापणी करून, मळणी यंत्राने काढून घ्यावी असा सल्ला हवामान अभ्यासक देतात.