Soyabean Fertilizer Management:- सोयाबीन पेरणी सोबत कोणते खत वापरले पाहिजे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
सोयाबीन हे एक महत्वाचं कडधान्य व तेलवर्गिय पीक आहे. या पिकात 20 टक्के तेलाचे तर 40 टक्के प्रथिने चे प्रमाण आहे. गेल्या वर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर मोठा परिणाम दिसून आला. परंतु यंदा सरासरी 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा नक्कीच सोयाबीन लागवड वाढणार आहे.
सोयाबीन हे कमी कालावधीचे म्हणजे 95 ते 100 दिवसाचे पीक असल्यामुळे या पिकात अचूक पद्धतीने खत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, बियाण्याची निवड, पेरणी अंतर अश्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातच सोयाबीन पेरणी बरोबर अचूक पद्धतीने खत व्यवस्थापन सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाची बाब आहे.
सोयाबीन या पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात हे पीक हवेतील नत्र जमिनीत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देते, त्यामुळे सोयाबीन या पिकासाठी नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा. त्याच बरोबर सोयाबीन या पिकासाठी स्पुरद, पालाश त्याच बरोबर गंधक या अन्नद्रव्यांची खूप गरज असते. सोयाबीन हे पीक तेलवर्गीय आहे त्यामुळे या पिकासाठी गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य 10 किलो प्रति एकरी देणे अवश्य आहे.
सल्फर:- (गंधक) चे सोयाबीन पिक्साठी फायदे:-
1- सोयाबीन बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढते व बियाणे टपोरे वजनदार होतात.
2- प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते.
3- सोयाबीन चे पाने हिरवीगार होतात.
4- झाडाची वाढ निरोगी आणि जोमदार होते.
5- सोयाबीन उत्पादनात वाढ होते.
सोयाबीन खत व्यवस्थापन:-
1- DAP:- (18-46-00) हे खत एकरी 01 बॅग त्याच बरोबर 10 किलो गंधक तसेच 20 किलो पालाश देणे गरजेचे आहे.
2- सोयाबीन पेरणी अगोदर एकरी 1.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेकून दयावे त्यानंतर पेरणी सोबत 12-32-16 1.5 बॅग तसेच 10 किलो गंधक प्रती एकरी पेरणी सोबत दयावे.
3- 10-26-26 हे एकरी 01 बॅग त्याच बरोबर सिंगल सुपर फॉस्फेट 1.5 बॅग नत्राच प्रमाण जमिनीत कमी असेल तर 16 किलो नत्र तसेच 10 किलो गंधक प्रती एकरी दयावे.
सूचना:- सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन करण्याअगोदर जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे त्यांनतर योग्य पद्धतीने वरील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे धन्यवाद…