सोयाबीन पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन कसे करावे संपूर्ण माहिती

Soyabean Leaves Eating Caterpillar:- सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन कसे करावे..

सोयाबीन पाने खाणारी अळी नियंत्रण
Soyabean Leaves Eating Caterpillar:- सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन कसे करावे..

सोयाबीन हे पीक राज्यातील एक महत्वाचे तेल वर्गीय आहे. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो त्यातच बदलते वातावरण, ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीन पिकातील पानावर उंट अळी, केसाळ अळी, पाने खाणारी अळी, घाटे अळी अश्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सोयाबीन पीक उत्पादन वाढीसाठी अळी नियंत्रण करणे गरजेचे आहे, त्यामुळे सोयाबीन पिकात अळीनाशक वापरणे अत्यावश्यक आहे.

सोयाबीन पिकावरील अळी नियंत्रण करण्यासाठी फक्त फवारणी व्यवस्थापन करून चालणार नाही, कीटकनाशक फवारणी खर्च कमी करण्यासाठी काही उपयोजना करणे गरजेचे आहे. सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव कमी असतो त्यावेळेस काही उपयोजना केल्यास आपण पिकाच्या नुकसानीची आर्थिक पातळी वलांडण्या अगोदर कीड नियंत्रण करू शकतो.

• अळी नियंत्रण उपयोजना:-

सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खालील उपयोजना करू शकता.
1- तन नियंत्रण करणे : अनेक वेळा सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात तन वाढते, त्यामुळे काही किडींना त्यांचे खाद्य मिळते व त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सोयाबीन कीड नियंत्रण करण्यासाठी सर्वप्रथम तन नियंत्रण करणे गरजेचे आहे.

2- खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिवळी पडलेले कीड ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. उपटलेले खोड कीड ग्रस्त झाड पुन्हा शेतात फेकू नये तर लांब नेऊन नष्ट करावे.

3- सोयाबीन पिकाच्या पानावर अळी किंव्हा अळीचे अंडी दिसून आल्यास त्यांचा नायनाट करावा.

4- हेक्टरी 5 कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकात किती प्रमाणत झाले आहे त्यानुसार तुम्ही व्यवस्थापन करू शकता.

5- हेक्टरी 40 Bird Stand पक्षी थांबे सोयाबीन पिकात उभारावे त्यामुळे पक्षी त्यावर येऊन थांबतील आणि अळी दिसताच वेचून खातील. असे केल्यास 20 टक्के अळी नियंत्रण होऊ शकते.

6- निंबोळी अर्क 5 टक्के फवारणी मधून वापरावे.

• आर्थिक पातळी ओलांडल्यास रासायनिक फवारणी व्यवस्थापन:-

तुमच्या सोयाबीन पिकात पाने खाणारी अळी, तंबाखू वरील अळी, खोड किडींचा प्रादुर्भाव अधिक असेल तर रासायनिक उपाय करणे गरजेचे आहे त्यासाठी खालील कीटकनाशकांचा वापर तुम्ही फवारणी द्वारे करू शकता.
Emamectine Benzoate 5% SG 12 ग्रॅम प्रति पंप घ्यावे किंव्हा Alika कीटकनाशकं 10 मिली प्रती पंप घ्यावे किंव्हा अळीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास Coragen 6 मिली प्रती पंप घ्यावे धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *