सोयाबीन पीक धोक्यात ला निनो सक्रिय होणार? ऑगस्ट शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस घालणार धुमाकूळ!

सोयाबीन पीक धोक्यात ला निनो सक्रिय होणार? ऑगस्ट शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस घालणार धुमाकूळ! August and September Havaman Andaj..

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहणार.
सोयाबीन पीक धोक्यात ला निनो सक्रिय होणार? ऑगस्ट शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस घालणार धुमाकूळ!

व्हायरल फार्मिंग :- जुन महिन्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण सरासरी कमी होते, परंतु जुलै महिन्याचा शेवटच्या 15 दिवसात पावसाने धुमाकूळ घालत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात सरसरपेक्षा जास्त पाऊस जुलै महिन्यात झाला आहे.

तसेच काही जिल्ह्यातील धरणे आणि छोट मोठे तळे 100 टक्के भरले आहे तर काही जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पाणी पातळी पार केली आणि शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कसा असेल पाऊस? ऑगस्ट महिन्यात खंड पडेल का? सप्टेंबर महिन्यात ला निनो सक्रिय होणार का? संपूर्ण माहिती घेऊ..

नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतीविषयक व हवामान विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

आज ऑगस्ट महिन्याची 3 तारीख वार/शनिवार वाजले सकाळचे 11 आजही राज्यातील काही भागात भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे. दिनांक/ 8 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. काही भागात ऊन, ढगाळ वातावरण आणि जोरदार पाऊस असे वातावरण राहणार आहे. परंतु दिनांक/ 9 ऑगस्ट पासून राज्यात सर्व दूर सूर्यदर्शन होणार  असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला असून जुलैच्या शेवटच्या 15 दिवसात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश छोट मोठे धरणे 90 टक्के पेक्षा अधिक प्रमाणत भरले आहेत. काही ठिकाणी तर धरणाने पाण्याची धोका पातळी गाठली आहे.

• पुढील दोन महिने पावसाचा अंदाज कसा :-

जुलै महिन्यात ज्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते त्या शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी म्हणजे ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण सरासरी कमीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचा विचार केला तर सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याच्या मान्सून हंगामात राज्यासह देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तुळे आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यात ला निनो सक्रिय होण्यासाठी प्रशांत महासागरात पोषक वातावरण तयार झालेले आहे.
गेल्या वर्षी एलनिनो चा प्रभाव असल्यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु यावर्षी ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यात ला निनो सक्रिय होण्यासाठी प्रशांत महासागरात पोषक वातावरण तयार झाले असून ला निनो सक्रिय झाल्यास राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

• ऑगस्ट महिन्यात या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता? पावसाचा खंड.

जुलै महिन्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मान्सून पावसाचे प्रमाण कमी राहून सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात काही भागात सरासरीपेक्षा पावसाची शक्यता कमी परंतु सप्टेंबर महिन्यात मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्याचा विचार केला तर सरासरीपेक्षा अधिक पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ला निनोची स्थिती निर्माण झाल्यास पावसाचे प्रमाण अधिक राहील असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

• सूर्यदर्शन कधी?

आज दिनांक/ 3 ऑगस्ट 2024 आज पासून साधारण दिनांक/ 8 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून, राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच भाग बदलत जोरदार व मोठ्या थेंबाचा पाऊस पडणार आहे. व त्यांनतर दिनांक/ 9 ऑगस्ट पासून राज्यात सर्व दूर कडक सूर्यदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

• सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता?

दिनांक/ 9 ऑगस्ट पर्यंत राज्यात भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर पाऊस उघड देणार असून ऑगस्ट महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, परंतु सप्टेंबर महिन्यात प्रशांत महासागरात ला निनो सक्रिय झाल्यास सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण जून महिन्याच्या सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली त्या शेतकऱ्यांची सोयाबीन सप्टेंबर महिन्यात काढणीला येणार असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहिला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ होऊ शकते धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *