सोयाबीन फुल अवस्था सुरू होताच ही फवारणी करा फुलांचा पाऊस पडेल.. (Soyabean Favarni)…
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या सोयाबीन फुल संख्या भरघोस लागण्यासाठी फुल गळ कमी होण्यासाठी सोयाबीन पिकात फुल अवस्था सुरू होण्याअगोदरच एक फवारणी करणे गरजेचे आहे. अनेक शेतकरी सोयाबीन पिकात 70 किंव्हा 80 टक्के फुल लागल्यावर फवारणी करतात परंतु त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण फवारणी केल्यापासून काही दिवस रिझल्ट मिळायला लागतात.
शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
त्यामुळे सोयाबीन पिकात नेमकी फुल अवस्था सुरू होते त्यावेळी जर तुम्ही फवारणी केली तर अत्यंत उपयुक्त ही फवारणी सोयाबीन फुल संख्या वाढवण्यासाठी तसेच फुलगळ कमी करण्यासाठी ठरनार आहे.
सोयाबीन फुलगळ होण्याचे कारणे:-
सोयाबीन फुल अवस्थेत अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास फुल गळ होते.
बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यास सोयाबीन फुल अवस्थेत फुल गळ होते.
अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास सोयाबीन फुल गळ होते.
ढगाळ वातावरण असल्यास सोयाबीन फुल गळ होते.
असे वेगवेगळे कारण आहेत ज्या गोष्टीमुळे सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात फुल गळ होते त्यामुळे वरील सर्व गोष्टीचा विचार करून फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सोयाबीन फुल अवस्था सुरू होतात तुम्हाला अळी नियंत्रण करण्यासाठी Evicent किंव्हा Emamectine Benzoate किंव्हा Ampligo या पैकी एक अळी नाशक घ्यायचे आहे.
सोयाबीन फुल अवस्था सुरू होताच फुल संख्या वाढवण्यासाठी Amino Acid देणे गरजेचे आहे, त्यामुळे या फवारणी सोबत Tata Bahaar किंव्हा Fantac Plus किंव्हा Isabion किंव्हा Sagarika किंव्हा Biovita X या पैकी कोणतेही एक टॉनिक घ्यावे किंव्हा अनिमो एसिड असलेले कोणतेही टॉनिक तुम्ही घेऊ शकता.
सोयाबीन फुल अवस्था सुरू होताच 00-52-34 हे विद्राव्य खत या फवारणी सोबत घेतल्यास चांगला फायदा मिळतो, त्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम प्रति पंप 00-52-34 देखील घ्याचे आहे.
अनेक दिवसापासून वातावरण अत्यंत खराब आहे अश्या वातावरणामुळे सोयाबीन फुल अवस्थेत बुरशी वाढते आणि फुल गळ होते त्यासाठी एक कोणताही बुरशीनाशक या फवारणी सोबत घ्यावे..