सोयाबीन पीक लेच वाढल मंग वाढ थांबण्यासाठी हा उपाय करा.. Soyabean pgr Mahiti..
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाची सतत धार सुरू असल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ मर्यादेपेक्षा जास्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतात सोयाबीन हे मांडी आणि कंबरे पर्यंत वाढली आहे. सोयाबीन पिकाची जास्त वाढ होणे देखील सोयाबीन उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण ठरू शकते. कारण सोयाबीन वाढ जास्त झाल्यास फुलांची संख्या कमी लागते तसेच फुलगळ मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ जास्त होत असेल तर वाढ कमी करण्यासाठी वेळीच काही उपयोजना करणे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो सतत धार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पीक खूप जास्त वाढले आहे, अतिरेक वाढ होऊ नये त्यासाठी सोयाबीन पिकास कमी नत्र युक्त खतांचा वापर करावा असा सल्ला कृषी तज्ञ देतात कारण सोयाबीन पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात आणि या गाठी हवेतील नत्र जमिनीत उपलब्ध करून देतात, त्यामुळे सोयाबीन पिकास नत्र युक्त खतांचा वापर कमी करावा असा सल्ल कृषी तज्ञ नेहमी देतात.
या वर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला असून या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक खूप वाढले आहे. विशेष विदर्भ आणि मराठवाड्यातील काळी कसदार जमिनीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे, अश्या शेतकऱ्यांची सोयाबीन एक ते दीड महिन्यात मांडी आणि कंबरे पर्यंत पोहचली आहे. काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात फवारणी करण्यासाठी भीती वाटत आहे.
टिप्स – शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ मर्यादेपेक्षा जास्त झाली असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या सोयाबीन दुसऱ्या फवारणी मध्ये pgp म्हणजे Plant Growth Promotor किंव्हा Bio stimulant घ्यायचे नाही अन्यथा तुमच्या सोयाबीन पिकाची पुन्हा जास्त वाढ होईल.
• सोयाबीन वाढ थांबवण्यासाठी उपाय :-
शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ होत असेल, तर तुम्हाला सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणी मध्ये सोयाबीन फुल अवस्थेत येण्याअगोदर pgr म्हणजे Plant Growth Regulator घेणे गरजेचे आहे, त्यासाठी तुम्ही Taboli 3 मिली प्रती पंप किंव्हा Cultar 4 ते 5 मिली प्रती पंप घेऊ शकता धन्यवाद..