हरभरा पिकातील घाटे वजनदार व टपोरे होण्यासाठी उपाय.
शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकातील घाटे अवस्थेत घाटे पोसण्यासाठी व दाने टपोरे होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे त्या बद्दल वैज्ञानिक माहिती घेऊ.
हरभरा घाटे अवस्था सुरू झाल्यानंतर हरभरा पिकासाठी नत्रयुक्त विद्राव्य खतांचा वापर करणे खूप गरजेचं आहे कारण हरभरा पिकात घाटे अवस्था सुरू झाल्यानंतर हरभरा झाडात साठवलेले अन्नद्रव्य घाटे पोसण्यासाठी झाड वापरत असते. त्यामुळे हरभरा घाटे अवस्थेत नत्रयुक्त खतांची गरज खूप वाढते. हरभरा घाटे अवस्थेत नत्रयुक्त खताचा पुरवठा कमी झाल्यास हरभरा पिवळा पडतो व घाटे कमी भरतात.
शेतकरी मित्रांनो हरभरा घाटे अवस्थेत जर आपण 2% युरिया खताची फवारणी केली तर हरभरा उत्पादन वाढीसाठी खूप मोठा फायदा होतो. 2 टक्के युरिया फवारणी म्हणजे 100 लिटर पाण्यातून 2 किलो युरिया फवारणी करावी.
2 टक्के युरिया फवारणी चे फायदे;
1- हरभरा घाटे अवस्थेत पिकाच्या पानात हरितद्रव्य तयार होऊन झाड हिरवेगार राहते.
2- हरभरा पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात त्या गाठींना खाद्य पदार्थ पुरवण्यासाठी मदत होते.
तसेच हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत 13-00-45 या विद्राव्य खतांचा वापर केल्यास मोठा फायदा होतो. कारण 13-00-45 या विद्राव्य खतामध्ये 13 टक्के नत्र तर 45 टक्के पालाश असते.
घाटे अवस्थेत नत्र कमी पडल्यास जिवाणूंच्या गाठी काळ्या पडतात व त्या जिवाणू गाठी झाडात अन्नद्रव्य पुरवठा कमी करते त्यामुळे हरभरा पिकाचे पाने पिवळी पडतात व हरभरा घाटे फोस राहतात आणि उत्पादन ही कमी मिळते.
तसेच 13-00-45 या विद्राव्य खतात 45 टक्के पालाश असते. मित्रांनो पालाश हे एक प्रथम अन्नद्रव्य आहे या अन्नद्रव्याची गरज हरभरा घाटे अवस्थेत आहे.
पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यामुळे झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते, झाडावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच घाटे पोसण्यासाठी व दाण्यांना चमक व चकाकी येण्यासाठी पालाश खूप खूप महत्वाचे आहे.
हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत ढगाळ वातावरण किंव्हा धुक अधिक असेल तर हरभरा घाटे फोस राहतात त्या मध्ये दाने भरत नाही. त्यामुळे धुक अधिक असेल तर सकाळी सकाळी शेतात धूर केला पाहिजे व बुरशीनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.
हरभरा घाटे चांगले भरण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन ही खूप गरजेचे आहे. हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत पाणी देऊन फवारणी केल्यास खूप मोठा दिसून येतो. जमिनीत वल असल्यामुळे केलेल्या फवारणीचा 100 टक्के फायदा होता.
ह000050 फायदेरभरा घाटे अवस्थेत घाटे टपोरे व वजनदार होण्यासाठी 13-00-45 विद्राव्य खतांचा वापर 100 ग्राम प्रति पंप किंव्हा 00-00-50 विद्राव्य खत 100 ग्राम प्रति पंप किंव्हा 2 टक्के युरिया फवारणी किंव्हा जीब्रेलिक एसिड 40 मिली प्रती पंप फवारणी करावी.