दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी या जिल्ह्यांना गारपीट?
February Weather Forecast:- शेतकरी मित्रांनो आज दिनांक. 4 फेब्रुवारी 2024 वार रविवार हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा हवामान अंदाज जाहीर झाला आहे.
राज्यातील गारठा कमी होऊन तापमानाचा पारा वाढणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. तसेच राज्यातील शेतकरी बांधवांची तूर, हरभरा व गहू काढणी चालू झालेली आहे त्यातच विदर्भातील बहुतांश भागात ही काढणी सुरू झालेली आहे.
राज्यात पूर्व विदर्भ व पच्छिम विदर्भातील काही जिल्ह्यात दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस तसेच काही भागात जोरदार गारपीट होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
Panjab dakh havaman andaj:- हवामान अभ्यासक पंजाबराव डख सांगतायत की आज दिनांक 4 फेब्रुवारी पासून ते 10 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस ने घट होऊन थंडी कमी होणार आहे. परंतु दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
नंतर पूर्ण विदर्भातून हा पाऊस पच्छिम विदर्भात देखील होणार आहे त्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील थोड्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे.
तसेच देशात दिनांक 10 फेब्रुवारी पासून तापमानाचा पारा खूपच वाढणार आहे त्यामुळे टरबूज व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो असा सल्ला पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद…