Mukhaymantri Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील गोर गरीब महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Mukhaymantri Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील गोर गरीब महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.•तरी एका कुटुंबातील पात्र दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एका कुटुंबातील एका विवाहित व एका अविवाहित 21 वर्षा पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबातील महिलांना घेता येणार नाही? त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
1- वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत मात्र तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे अश्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता यानर नाही. म्हणजे राज्यातील गोर गरीब महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. तसेच या योजनेचे फॉर्म भरणे सुरू असून अनेक महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले आहे.
2- वय वर्ष 21 वर्षा खालील व वय वर्ष 65 वर्षा वरील महिलांना या योजनेचा लाभ किंव्हा या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
3- लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्र राज्यात सुरु केली असून या योजनेअंतर्गत महिन्याला 1 हजार 500 रुपये तर वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहे तरी वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
4- वय वर्ष 21 पुढील एक कुटुंबातील अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
5- या योजनेसाठी पात्र होयचे असेल तर स्वतःचे बँक आधार लिंक खाते असणे बंधनकारक आहे, कारण महिलांना प्रति माह 1 हजार 500 रुपये थेट बँक खात्यात DBT द्वारे येणार आहे.
6- तसेच केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
7- तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नौकरी करत असेल तर अश्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
8- ज्या कुटुंबातल्या व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न भारतात अश्या कुटुंबातल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही धन्यवाद…