19 जानेवारी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रविकांत तुपकर यांचे आक्रमक आंदोलन

कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक:-

रविकांत तुपकर सोयाबीन कापूस भाववाढीसाठी आंदोलन
19 जानेवारी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रविकांत तुपकर यांचे आक्रमक आंदोलन

दिनांक 18/ जानेवारी पर्यंत सोयाबीन कापूस भाव वाढवण्यासाठी सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास 19/ जानेवारी सकाळी 6 वाजेला मलकापूर रेल्वे स्टेशन वर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुंबई, दिल्ली व गुजरात या मार्गाने जाणाऱ्या रेलव्या आम्ही रोखण्यासाठी दिनांक 19/ जानेवारी रोजी आक्रमक भूमिका घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा आक्रमक भूमिका घेणार शेतकरी नेते रविकांत तुपकर.

तेलाचे आयात शुल्क कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तेल आयात होत आहे, सोयाबीनचे भाव कमी झाले आहे. या भावाने शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही त्यामुळे दिनांक 18/ जानेवारी पर्यंत सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलने सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी आंदोलने करत आहेत. रविकांत तुपकर हे हिवाळी अधिवेशनात देखील कापूस सोयाबीन भाववाढीसाठी आंदोलन घेऊन गेले होते परंतु आजूनही सरकारने सकारात्मक प्रतिसाद कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी दिलेला नाही.

त्यामुळे दिनांक 19/ जानेवारी रोजी रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह मलकापूर रेल्वे स्टेशन वर आक्रमक भूमिका घेणार आहे. कारण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही शेतकरी कापूस सोयाबीन भाव वाढीचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलो आहे तरी आम्हाला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

सोयाबीन व कापसाला उत्पादन खर्च अधिक असून बाजारात भाव मात्र खूपच कमी मिळत आहे. सोयाबीन भाव 4,500 रुपये वर तर कापूस भाव 6,500 ते 7,000 रुपये वर येऊन पडला आहे. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर सोयाबीन कापूस भाववाढीसाठी निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आहे.

पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे तरी आजुन सरकारने एक रुपयाची ही शेतकऱ्यांना मदत केलेली नाही, कापूस पिकातील लाल्या रोगाची मदत केलेली नाही तसेच सोयाबीन पिकातील येलो मोझाईक ची मदत केलेली नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या नुकसानीची मदत केलेली नाही ही मदत केंद्र सरकारने लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आहे.

परंतु तेल आयात शुल्क कमी करून सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचा विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली आहे, सोयाबीन चे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहे तसेच कापूस भाव वाढत नाही त्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीन व कापूस भाव वाढवावे त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी दिनांक 19/ जानेवारी रोजी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी मित्रांनो अश्याच नवनवीन शेतीविषयक माहिती साठी नक्की भेट दया पोस्ट शेअर करा धन्यवाद….

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *