यंदाही मान्सून धोका देणार का? हवामान तज्ञ डॉ के एस होसलिकर काय म्हणतात:-
(Monsoon update 2024) शेतकरी मित्रांनो पुणे हवामान संस्थेचे प्रमुख डॉ के एस होसालिकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक माहिती दिली आहे. हवामान तज्ञ डॉ के एस होसलीकर साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 वर्षातील खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर अल निनोचा प्रभाव कमी होणार आहे. परंतु पूर्ण उन्हाळ्यात अल निनोचा प्रभाव दिसून येणार आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक राहणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. खरीप हंगाम सुरू होतात अल निनोचा प्रभाव कमी होईल व त्यामुळे या वर्षी खरीप हंगामात अल निनोचा प्रभाव नसणार आहे. या वर्षी म्हणजे 2024 खरीप हंगामात होणारा पाऊस हा सरासरी सामान्य असेल अशी माहिती डॉ के एस होसालीकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी 2023 वर्ष खूप हलाखीचे ठरले आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने मोठा धोका दिला. कापूस, सोयाबीन व तूर लागवडीच्या वेळी पावसाने जवळपास एक महिना खंड दिला होता. त्यामुळे पिकाच्या पेरण्या उशिरा झाल्या व त्यांनतर ही पाऊस कमीच राहिला त्यामुळे मागील खरीप हंगाम राज्यातील शेतकऱ्यांना खूपच नुकसानकारक ठरला आहे. परंतु 2024 खरीप कसा असेल याची चिंता देशातील शेतकऱ्यांना लागली आहे. मेरिकन हवामान संस्था नोआ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरातील पुष्टभागवरील तापमान कमी होत असल्यामुळे हळू हळू अल निनोचा प्रभाव कमी होऊन 2024 खरीप हंगामात अल निनोचा प्रभाव दिसणार नाही असे भाकीत नोआ ने केले आहे. तसेच स्कायमेट या हवामान संस्था ने देखील अल निनोचा प्रभाव कमी होऊन सरासरी खरीप 2024 हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत त्यांनी वर्तवली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आजुन 2024 खरीप हंगामाबद्दल माहिती दिलेली नाही, कारण ते म्हणतात घाईत दिलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. कारण खरीप हंगामात पाऊस कसा असेल याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात जसे की पृथ्वीचे तापमान, वाऱ्याची दिशा, समुद्रातील तापमान व आर्द्रता अश्या अनेक गोष्टी पाऊस कसा असेल यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच 2024 खरीप हंगामात पाऊस कसा असेल याची माहिती शेतकऱ्यांना देईल धन्यवाद…