2024 monsoon update:- शेतकरी मित्रांनो यंदा एल निनोचा प्रभाव कसा असेल व ला नीना सक्रिय होणार का पाहा संपूर्ण माहिती.
शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळे गेल्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला. अनेक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, तूर व हरभरा पिकाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक पाठबळ बिघडले आहे. शेतकऱ्यांना खरीप 2024 हंगाम सुरू होण्याअगोदर एक चिंता लागली आहे. यंदा ही एल निनोचा प्रभाव असेल का? यंदा ही दुष्काळ पडेल का? या वर्षी ला नीना सक्रिय होणार कर? त्याच विषयी आपण या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत.
2024 मान्सून साठी पोषक वातावरण तयार होण्याची अधिक शक्यता. एल निनोचा प्रभाव जुन महिन्या पर्यंत न्यूट्रल होण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची शक्यता NOAA, UKMO, CanSIPS या संस्थेने वर्तवली आहे.
यंदा जुन, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर कोणत्या महिन्यात पावसाचा अधिक अंदाज आहे सविस्तर माहिती घेऊ. यंदा मे महिन्यापर्यंत एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे जुन महिन्यात ला नीना सक्रिय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु जुन महिन्यात ला नीना प्रभाव थोडा कमी असेल त्यामुळे जुन महिन्यात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ला नीना अधिक सक्रिय होऊन जोरदार पावसाचा अंदाज या दोन महिन्यात आहे. जुलै महिन्यात शेतकऱ्यांचा पेरणी उरकलेल्या असतात आणि या महिन्यात पिकाची उगवण आणि चांगली वाढ होण्यासाठी पावसाची आवश्यकता असते त्यामुळे या वर्षी जुलै महिन्यात चांगला पावसाचा अंदाज NOAA, UKMO, CanSIPS या संस्थेने वर्तवली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात यंदा चांगला मान्सून राहणार असल्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद…