soyabean futve; सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी उपाय फुटवेच फुटवे लागतील

सोयाबीन पिकात भरघोस फुटवे लागण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स खाली सविस्तर वाचा. (Soyabean futve upay).

soyabean futve vadhavnyasathi upay
सोयाबीन पिकात भरघोस फुटवे लागण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स खाली सविस्तर वाचा. (Soyabean futve upay).

शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. सोयाबीन पिकाचे एकरी भरघोस म्हणजे 12 ते 15 क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्या सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुटवे कसे येतील या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी आपल्याला काय उपयोजना करता येईल त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सोयाबीन पिकात जेवढे जास्त फुटवे तेवढे जास्त फुलांची आणि शेंगांची संख्या लागणार आहे. एकरी अधिक उत्पादन घेण्याचा दृष्टीने सोयाबीन पिकात अधिक शेंग धारणा होणे गरजेचे आहे त्यासाठी आपली सोयाबीन फक्त उभात न वाढता जास्तीत जास्त कशी पसरट वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण सोयाबीन फुटवा वाढवण्यासाठी काही उपयोजना सांगणार आहोत त्या सविस्तर वाचा..

शेतकरी मित्रांनो आपण नेहमी शेती विषयक, हवामान विषयक अचूक माहिती शेतकऱ्यांना देत असतो, त्यामुळे आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा पोस्ट शेअर करा.

• सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी उपाय:-

1- उपाय पहिला :- नत्र युक्त खतांचा संतुलित वापर करणे. मित्रांनो सोयाबीन हे एक कडधान्य पीक असून या पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात, त्यामुळे सोयाबीन हे पीक हवेतील 78 टक्के नत्र जमिनीत उपलब्ध करून देते. त्यासाठी आपल्याला सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी संतुलित नत्र युक्त खतांचा वापर करणे गरजेचे आहे, कारण अधिक प्रमाणत नत्र वापरल्यास सोयाबीन ची फक्त वाढ होते परंतु फुटवे संख्या कमी लागून उत्पादन घट होऊ शकते.

2- उपाय दुसरा :- शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना असे वाटते की आपल्या सोयाबीन पिकात फुटवा अधिक प्रमाणत लागावा परंतु सोयाबीन फुटवे संख्या जास्त लागण्यासाठी तुमची जमीनही तितकीच कारणीभूत आहे. मित्रांनो जर तुमची जमीन हलकी असेल तर फुटवा कमी लागतो जर तुमची जमीन कसदार भारी असेल तर फुटवा अधिक लागतो.

3- उपाय तिसरा :- पहिली फवारणी वेळेवर करणे, शेतकरी मित्रांनो सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान करणे गरजचे आहे, तसेच या फवारणी मध्ये फुटवे वाढवण्यासाठी असलेल्या टॉनिक किंव्हा 12-61-00 या सारख्या विद्राव्य खतांचा वापर करणे गरजेचे आहे. 12-61-00 हे विद्राव्य खत वापरल्यास नत्राचे प्रमाण कमी तर स्पुरद अधिक प्रमाणात मिळत असल्याने सोयाबीन मुळांची वाढ निरोगी होते व फुटवे वाढवण्यासाठी मदत होते.

4- उपाय चौथा :- आपल्या शेतातील सोयाबीन पिकात फुटवे कसे लागतात हे आपण निवडलेल्या सोयाबीन वानावर ही अवलंबून आहे. जर आपण उभाट वाढणाऱ्या वाणाची निवड केली असेल तर ते वान जास्त वाढतात जर आपण फुटवे करणाऱ्या वाणाची निवड केली असेल तर अधिक प्रमाणात फुटवे लागतात ही गोष्ट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *