Soyabean Tannashak Favarni; सोयाबीन साठी कोणते तणनाशक वापरावे!

Soyabean Herbicide Spray:- सोयाबीन तणनाशक फवारणी संपूर्ण माहिती..

soyabean tannashak favarni mahiti

नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो सोयाबीन तणनाशक फवारणी अगोदर शेतकऱ्यांना तणनाशक बद्दल पुरेपूर माहिती नसेल तर अनेक वेळा चुकीचा डोस वापरून किंवा चुकीची फवारणी करून आपण आपल्या सोयाबीन पिकांमध्ये मोठे नुकसान करून घेतो, त्यामुळे सोयाबीन तणनाशक फवारणी अगोदर आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

• सोयाबीन तणनाशक फवारणी शेतकरी का करतात?

शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातील तन नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे तणनाशके मार्केट मध्ये उपलब्ध आहे. अनेक शेतकरी बांधव कोळपणी किंव्हा खुरपणी करून तन नियंत्रण करतात परंतु सतत पाऊस चालू असेल तर अश्या परिस्थितीत कोळपणी किंव्हा खुरपणी करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही, तसेच लेबर मिळत नसल्यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात तणनाशक फवारणी कडे वळत आहे. परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांना तणनाशक बद्दल संपूर्ण माहिती नसल्यामुळे चुकीचे तणनाशक फवारणी करणे किंव्हा तणनाशक डोस कमी जास्त वापरणे या कारणामुळे सोयाबीन पिकात मोठे नुकसान होते.

• सोयाबीन तणनाशक फवारणी कधी करावी:-

शेतकरी मित्रांनो अनेक वेळा शेतकऱ्यांना सोयाबीन तणनाशक फवारणी करूनही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही त्यांचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या वेळी किंव्हा तन मोठे झाल्यावर केलेली फवारणी. मित्रांनो सोयाबीन तणनाशक फवारणीचा 100 टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर सोयाबीन पेरणी पासून 18 ते 21 दिवसाच्या दरम्यान तणनाशक फवारणी करणे गरजेचे आहे कारण या कालावधीत तन हे दोन किंव्हा तीन पानावर असते. तन मोठे झाल्यास किंव्हा तणनाशक फवारणी उशिरा केल्यास रिझल्ट मिळत नाही.

• तणनाशक कोणते वापरावे:-

शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे तणनाशके आहेत जे तुम्हाला चांगल वाटेल त्या तणनाशकाचा वापर तुम्ही करू शकता परंतु मी काही तणनाशके तुम्हाला सांगणार आहे त्या तणनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता.

• Adama Shaked (आदामा शकेद तणनाशक) हे तणनाशक सोयाबीन उभ्या पिकात तन दोन ते तीन पानावर असल्यास लागवडीपासून 21 दिवसाच्या दरम्यान वापरावे. डोस 800 मिली प्रती एकरी आहे.

• Syngenta Fusiflex हे तणनाशक सोयाबीन 21 दिवसाची असल्यास उभ्या पिकात वापरावे. तन हे दोन ते तीन पानावर असणे गरजेचे आहे. डोस 400 मिली प्रती एकरी आहे.

• Odyssey Herbicide ओडिसी तणनाशक:- हे तणनाशक BSAF कंपनी चे असून उभ्या सोयाबीन पिकात 21 दिवसाच्या दरम्यान वापरू शकता. डोस 40 ग्रॅम प्रति एकरी आहे.

• तणनाशक फवारणी बद्दल काही महत्वाची माहिती:-

1- तणनाशक फवारणी अगोदर कंपनीने सांगितलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
2- तणनाशक फवारणी साठी दूषित पाणी वापरू नये स्वच्छ पाणी वापरल्यास चांगला रिझल्ट मिळतो.
3- उभ्या सोयाबीन पिकात तणनाशक फवारणी तन तीन ते चार पानावर असल्यास करावी. जास्त ताण वाढल्यास रिझल्ट मिळत नाही.
4- तणनाशक हवेच्या विरुद्ध दिशेने केल्यास तणनाशक अंगावर येत नाही.
5- तणनाशक फवारणी साठी जो डोस कंपनीने सांगितला आहे तोच डोस घेणे गरजेचे आहे.
6- तणनाशक फवारणी साठी जमिनीत वल असणे गरजेचे आहे.
7- तणनाशक फवारणी शक्यतो सकाळी सकाळी करावी.
8- आज तयार केलेले द्रावण शक्यतो उदया फवारणीसाठी वापरू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *