Soyabean Dusari Favarni सोयाबीन दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी संपूर्ण माहिती.!
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी? सोयाबीन दुसरी फवारणी कधी करावी? सोयाबीन दुसरी फवारणी औषध? दुसरी फवारणी फायदे? अशी संपूर्ण अचूक माहिती आपण पाहणार आहोत तर चला.
नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो शेती विषयक माहितीसाठी, हवामान विषयक माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.
• सोयाबीन दुसरी फवारणी कधी करावी:
सोयाबीन दुसरी फवारणी सोयाबीन लागवडीपासून 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करावी किंव्हा पहिली फवारणी झाल्यापासून 20 दिवसाच्या अंतरावर दुसरी फवारणी करावी.
• सोयाबीन दुसरी फवारणी 45 ते 50 दिवसाला का करावी?
सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक असून या पिकात 45 दिवसा पासून फुल धारणा सुरू होते, त्यामुळे या काळात पाने खाणारी आलो, केसाळ अळी, उंट अळी तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फुल फळ होते, फुलांची संख्या कमी लागते त्यामुळे आपल्या दुसरी फवारणी 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करायची आहे.
• सोयाबीन दुसरी फवारणी औषध :
1- अळीनाशक Emamectine Benzoate 5% SG हे 12 ग्रॅम प्रति पंप साठी घ्यावे.
2- फुलांची संख्या वाढवण्यासाठी Tata Bahaar टॉनिक 40 मिली प्रती पंप किंव्हा Fantac Plus टॉनिक 10 मिली प्रती पंप घ्यावे.
3- फुलांचे देठ मजबूत होण्यासाठी फुलगळ कमी होण्यासाठी Boron 20% प्रती पंप साठी 20 ग्रॅम घ्यावे किंव्हा 00-52-34 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
4- वातावरण ढगाळ असेल तरच Saaf (Carbendazim + Mancozeb) बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
मित्रांनो अश्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाच्या 5 टक्के फुल अवस्थेत म्हणजे 45 ते 50 दिवसाच्या सोयाबीन पिकात दुसरी फवारणी करू शकता.
• दुसरी फवारणी टिप्स:-
1- सोयाबीन दुसरी फवारणी करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे.
2- फवारणी शक्यतो सकाळी करावी.
3- फवारणी साठी वरील सांगितलेले प्रमाण योग्य वापरावे.
4- काही कारणामुळे द्रावण फुटत असेल तर फवारणीसाठी असे द्रावण वापरू नये.
5- फवारणी घाई घाईत करू नये योग्य पाण्याचे प्रमाण एकरी ठेवावे.
• दुसरी फवारणी फायदे:-
1- पाने खाणाऱ्या अळीचा वेळीच बंदोबस्त होतो.
2- फूल गल कमी होते.
3- फुलांची संख्या वाढवण्यासाठी मदत होते.
4- फुलांच्या देठावर बुरशी लागत नाही.
5- फुटवे वाढवण्यासाठी फायदा होतो.
6- सोयाबीन वाढीसाठी फायदा.
7- भरघोस उत्पादन मिळते.
शेतकरी मित्रांनो सोयाबीन दुसरी फवारणी याबद्दल माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही पोस्ट शेअर करा धन्यवाद.