IMD Alert Today; आज राज्यातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा!
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार राज्यात पुढील चार दिवस म्हणजे 15 जुलै पर्यंत कोकण, विदर्भाचा काही भाग आणि मध्ये महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे.
• आज दिनांक/ 11 जुलै भारतीय हवामान खात्याने दिलेलं खालील हवामान अंदाज पाहा..
मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण तसेच गोवा या भागात मुसळधार पाऊस झाला आहे तसेच आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.
• ऑरेंज अलर्ट:-
आज कोकणातील पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान अंदाज दिला असून या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
• येलो अलर्ट:-
आज कोकणातील, उत्तर महाराष्ट्रातील आणि मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून वरील जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
• विजेंचा कडकडाट:-
आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाट हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यात कोरडे हवामान राहणार असून काही ठिकाणी रात्री हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज आहे.
• मराठवाडा हवामान अंदाज:-
आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नगर, धाराशिव, लातूर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे. काही ठराविक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो.
• धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात काही भागात मध्येम व हलका पाऊस पाहायला मिळू शकतो.
• जील्ह्यानुसर हवामान अंदाज:-
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात मध्येम पावसाचा अंदाज आहे.
तसेच मराठवड्यातील सर्व जिल्ह्यात आज मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज नाही नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात विजेचा कडकडाट होऊ शकतो तर काही तुरळक भागात पाऊस होईल धन्यवाद.