Kapus Khatacha Dusra Dose; कापूस जोमदार वाढीसाठी खताचा दुसरा डोस कधी आणि कोणता दयावा!

Kapus Khatacha Dusra Dose; कापूस पिकाची खताचा दुसरा डोस कोणता संपूर्ण माहिती.

Kapus Khatacha Dusra Dose; कापुस खताचा दुसरा डोस कधी आणि कोणता दयावा!
Kapus Khatacha Dusra Dose; कापूस पिकाची खताचा दुसरा डोस कोणता संपूर्ण माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज आपण कापूस पिकासाठी खताचा दुसरा डोस कोणता? आणि कधी? द्यावा त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो माहिती शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला अचूक आणि योग्य माहिती मिळेल.

•कापूस पिकात दुसरा डोस कधी:-

शेतकरी मित्रांनो कापूस हे अधिक कालावधीचे पीक असून या पिकासाठी अचूक व योग्य खत व्यवस्थापन/नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. कापूस पिकासाठी खताचा पहिला डोस 25 दिवसाच्या आत दिला पाहिजे तर दुसरा डोस 45 ते 50 दिवसाच्या आत दिला पाहिजे तरच कापूस पिकाची जोमदार वाढ होते तसेच कापूस पिकात फुटवा चांगला लागतो.

• कापूस फुटवा का गरजेचा:-

शेतकरी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कापूस पिकात फुटवा वाढवण्यासाठी नत्र युक्त खतांचा वापर कमी करणे गरजेचे आहे. कापूस पिकात फुटवा जास्त म्हणजे पत्यांची आणि बोंडांची संख्या जास्त म्हणजे उत्पादनही जास्तच मिळणार. त्यामुळे कापूस दुसरा खताचा डोस देण्यासाठी नत्र युक्त खतांचा संतुलित वापर करावा.

• कापूस पिकात खताचा दुसरा डोस देण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट खूप गरजेचे, कारण कापूस पिकाची पाने लाल पडणे किंव्हा पिवळे पडणे याचे प्रमुख कारण म्हणजे मॅग्नेशियम आणि सल्फर ची झालेली कमतरता. मित्रांनो कापूस पिकात 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान कापूस लाल पडणे, कापूस पिवळा होणे तसेच कापूस पिकाची वाढ थांबणे ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे कापूस पिकास दुसरा खताचा डोस 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान दिलाच पाहिजे.

•खताचा दुसरा डोस कोणता:-

शेतकरी मित्रांनो कपाशिसाठी खताचा जो तुम्ही पाहिलं डोस वापरला आहे ते खत तुम्हाला दुसऱ्या डोस साठी वापरायचे नाही. वेगळे खत घेतले तर आजुन आपल्या कापूस पिकासाठी फायदा होऊ शकतो.

•दुसरा डोस:-

20-20-00-13 किंव्हा 10-26-26 किंव्हा 12-32-16 कोणतेही एक खत 50 किलो प्रति एकर साठी घ्यावे. त्याच बरोबर 25 किलो एकरी मॅग्नेशियम सल्फेट व जर तुम्ही 20-20-0-13 दुसऱ्या डोस साठी घेत असाल तरच 25 किलो पोटॅश घेणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी Youtube video पाहा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *