Monsoon Alert; आज या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट! विदर्भ आणि कोकणात मुसळधार!
Daily Rain Update:- मागील आठवडाभरापासून कोकणातील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे, तसेच आज दिनांक/ 19 जुलै ते 23 जुलै कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणात, सातारा, कोल्हापूर घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी अती जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तसेच सातारा आणि कोल्हापूर सपाट परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
• नाशिक, नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर हवामान अंदाज.
• नाशिक जिल्ह्यातील काही भागात आज मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज असून, वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलो मीटर प्रती घंटा राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे.
• छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहणार असून तुरळक ठिकाणी मध्यम व हलक्या सरी होतील तसेच जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा वेग प्रती घंटा 30 ते 40 किलो मीटर राहणार असून या जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
• पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या वरील जिल्ह्यांना हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून विजेंच्या कडकडाटासह जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
• धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात आज पावसाचे प्रमाण कमी राहणार असून मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आहे.
• कोकण, सातारा, कोल्हापूर घाट भागात तसेच विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या वरील जिल्ह्यातील काही भागात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. सातारा आणि कोल्हापूर घट परिसरात अती मुसळधार तुरळक ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे, तसेच कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तसेच सातारा आणि कोल्हापूर सपाट भागात मध्यम व हलका पाऊस असणार आहे तर घाट भागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
• सतर्क राहावे:-
राज्यात पुढील पाच दिवस पावसासाठी पोषक असून काही जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस होणार आहे, तरी काय काळजी घ्यावी.
• विजेच्या कडकडाटासह पाऊस असेल तर घराबाहेर पडू नये.
• मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असेल तर अशा रस्त्यावरून जाऊ नये, तसेच गाडी चालकांनी या रस्त्यावरून जात असताना सतर्क रहावे.
• नदी, धरणे आणि तलावाकाठी फिरायला जाणे टाळावे.
• पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी शेतात झाडाखाली जनावरांना बांधू नये.
• विजेचा कडकडाट होत असेल तर झाडाखाली बसू नये.
• पूर परिस्थिती निर्माण झाल्यास भर पाण्यातून येण्याचे धाडस करू नये धन्यवाद.