IMD Red Alert; आज पुढील काही तासातच या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..!

IMD Heavy Rain Alert; आज दोन जिल्ह्यात अती मुसळधार तर चार जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा!

आज 23 जुलै काही तासातच कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस
IMD Heavy Rain Alert; आज दोन जिल्ह्यात अती मुसळधार तर चार जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा!

व्हायरल फार्मिंग : बंगालच्या खाडीत तीव्र कमी दाबाचा पट्टा राज्यात या आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Today Havaman Andaj in Maharashtra)..

मागील 24 तासात राज्यात कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी 100 ते 200 मिली मीटर पर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कमी पाहायला मिळत असून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यम व हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात पूर परिस्थिती आजूनही निर्माण झालेली नसून काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच आहे.

• आज दिनांक/ 23 जुलै वार मंगळवार राज्यात कसा असेल पाऊस?

आजही पावसाचे प्रमाण सर्वाधिक कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात राहणार आहे. मराठवाड्यात सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून रात्रीच्या वेळी मध्यम व हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. (आजचा हवामान अंदाज 23 जुलै)..

• रेड अलर्ट:- (Monsoon Alert Today)..

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे, तर घाट भागात अती मुसळधार पाऊस होत आहे. आज दिनांक/ 23 जुलै रोजी रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट असून अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी आणि सातारा घाट माथ्यावरील भागात आजही अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. घाट माथ्यावरील भागात मगील काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश नद्यांनी पाणीपातळी क्षमता ओलांडली आहे.

• कोल्हापूर, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सपाट परिसरात मध्यम ते हलका तर घाट माथ्यावरील भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

• विदर्भातील सर्व जिल्ह्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजेंच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आज दिनांक/ 23 जुलै मंगळवार रोजी हवामान खात्याने वर्तवला आहे.

• येलो अलर्ट:- Yellow Alert Today..

राज्यातील चार जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामध्ये नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला असून काही भागात विशेष घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

• आजचा अंदाज थोडक्यात:-

•विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज विजेच्या कडकडाटासह येल्लो अलर्ट जरी आहे.

• मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात काही भागात मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.

• कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट असून अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

• मुंबई, नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यात आज येलो अलर्ट दिला असून जोरदार व मध्यम पावसाचा अंदाज आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *