ताक अंडी संजीवक तयार कसे करावे

ताक अंडी संजीवक माहिती:-

ताक अंडी टॉनिक
ताक अंडी संजीवक तयार कसे करावे

(Homemade Organic Tonic), राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण घरच्या घरी खूप कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात ताक अंडी संजीवक कशा पद्धतीने तयार करावे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ. कारण मित्रांनो एखांदे टॉनिक बाजारातून खरेदी करायचं असेल तर कमीत कमी 500 ते 1000 रुपय खर्च येतो पुन्हा खरेदी केलेले टॉनिक 100 टक्के चांगल्या क्वालिटी चे मिळेल का याची खात्री लागत नाही. त्यामुळे मित्रांनो घरच्या घरी खूपच कमी खर्चात ताक व अंडी या सामुग्री पासून पिकाच्या जोमदार वाढीसाठी व फुल धारणेसाठी टॉनिक कसे तयार करावे त्याबद्दल माहिती घेऊ.

ताण अंडी संजीवक हे फक्त एक जैविक टॉनिक नसून एक जैविक बुरशीनाशक आहे. तसेच ताक अंडी टॉनिक हे एक उत्कृष्ट घराच्या घरी तयार केलेलं टॉनिक आहे या टॉनिक चा वापर तुम्ही सर्व पिकासाठी करू शकता.

या टॉनिक चा वापर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत करता येती जस ही वाढीची अवस्था, फुल अवस्थेत व फळ अवस्थेत तुम्ही ताक अंडी संजीवक चा वापर करू शकता.

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जोमदार वाढीसाठी तसेच फुल अवस्थेत फुलांची संख्या वाढवण्यासाठी व फळ अवस्थेत फळांना पोसण्यासाठी या टॉनिक चा वापर करता येतो.

मित्रांनो हे टॉनिक 100 टक्के जैविक असल्यामुळे या टॉनिक चा दुष्परिणाम मानवी शरीरावर किंव्हा मित्र किडीला होत नाही.

ताक अंडी संजीवक फवारणी फायदे:-

1- मित्रांनी ताक अंडी संजीवक फवारणी केल्यास पिकांची जोमदार व निरोगी वाढ होते.

2- पिकातील फुटवा वाढवण्यासाठी हे टॉनिक उपयुक्त आहे.

3- फुल अवस्थेत फुलांची संख्या वाढवण्यासाठी हे टॉनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

4- फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ताक अंडी टॉनिक फायदेशीर ठरतं आहे.

5- ताक अंडी संजीवक हे एक उत्कृष्ट जैविक बुरशीनाशक म्हणून सुध्दा काम करणार आहे.

6- तुमच्या पिकातील बुरशी नियत्रंण करण्यासाठी हे टॉनिक उपयुक्त आहे.

म्हणजे शेतकरी मित्रांनो पिकातील कुठ्ल्याही अवस्थेत या टॉनिक चा वापर केल्यास तुम्हाला फायदा होणारच आहे.

गावरान अंडी:-

शेतकरी मित्रांनो गावरान अंडी मध्ये भरपूर प्रमाणात अमिनो एसिड (Amino acid), कॅल्शियम व प्रोटीन आहे.अमिनो एसिड (Amino acid) हे कुठ्ल्याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे त्यामुळे या संजीवक चा वापर केल्यास तुमच्या पिकाला वाढीसाठी भरपूर प्रमाणात अमिनो एसिड (Amino acid) मिळणार आहे. तसेच पिकाच्या फुल अवस्थेत सुध्दा अमिनो एसिड खूप महत्वाचे आहे कारण अमिनो एसिड चा वापर केल्यास फुल गळ कमी होते व फुलांची संख्या वाढते.

ताक अंडी संजीवक तयार करण्याची पद्धत:- शेतकरी मित्रांनो ताक अंडी संजीवक तयार करण्यासाठी तुम्हाला एक प्लास्टिक बरणी मध्ये 1 लिटर ताक घ्यायचे आहे ताक हे गावरान गाईचे असल्यास उत्तम त्यांनतर त्यात 10 गावरान अंडी फोडून टाकायचे आहे शक्यतो गावरान कोंबडी चे अंडी घ्या व द्रावण एका लाकडी काडी च्या मदतीने चांगले हलवून घ्यावे त्यानंतर हे मिश्रण 3 दिवस झाकण बंद करून ठेवावे परंतु दिवसातून दोन वेळा ते द्रावण हलून घ्यावे व तीन दिवसा नंतर या द्रावणात रात्री 100 ग्राम गावरान गुळ बारीक करून टाकावा व त्यानंतर 4 किंव्हा 5 दिवसी या संजीवक ची फवारणी करू शकता.

गावरान गुळात लोह जस्त असते तसेच गुळात गोडवा असल्यामुळे आपल्या पिकात मित्र किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

फवारणी साठी प्रमाण:–  कमी कालावधीच्या पिकासाठी म्हणजे कडधान्य किंव्हा तृणधान्य पिकासाठी 50 मिली प्रती पंप तर फळबाग पिकासाठी 100 मिली प्रती पंप वापर करावा.

शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *